सिकलसेल विशेष अभियान ‘अरुणोदय’ अंतर्गत धार येथे विवाहपूर्व-प्रसूतिपूर्व समुपदेशन सत्र संपन्न
1 min read

सिकलसेल विशेष अभियान ‘अरुणोदय’ अंतर्गत धार येथे विवाहपूर्व-प्रसूतिपूर्व समुपदेशन सत्र संपन्न

Loading

सिकलसेल विशेष अभियान ‘अरुणोदय’ अंतर्गत धार येथे विवाहपूर्व-प्रसूतिपूर्व समुपदेशन सत्र संपन्न

अमळनेर प्रतिनिधी
सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शक सूचनेनूसार सिकलसेल अँनिमिया विशेष अभियान ‘अरूणोदय’ राज्यातील एकवीस आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.त्या अंतर्गत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल मॅडम,मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.सचिन भायेकर सर,तालूका आरोग्य अधिकारी मा डाॅ.गिरीश गोसावी सर,वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र मारवड डाॅ.साहील चौधरी आणि डाॅ.विद्या देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्यमान आरोग्य केंद्र धार ता.अमळनेर येथे *’विवाहपूर्व आणि प्रसूतिपूर्व समुपदेशन सत्र* दिनांक सात फेब्रुवारी रोजी पार पडले.या सत्रात सिकलसेल अँनिमिया म्हणजे काय,त्याची कारणे ,लक्षणे,उपचार व घ्यावयाची काळजी याचे सविस्तर विवेचन समुदाय आरोग्य अधिकारी डाॅ.दिनेश गोकूळ पाटील यांनी केले आणि उपस्थित लाभार्थी यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले. सिकल सेल अँनिमिया तपासणी सरकारी रूग्णालयांत मोफत होते असे आरोग्य सेवक श्री.डी.आर
पवार यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमाला माध्यमिक शिक्षक एम.व्ही.पाटील,शिक्षिका सुनंदा.ए.पाटील मॅडम,उर्दू शाळा शिक्षिका आपसीन मुजावर मॅडम,जन आरोग्य समिती सदस्या आशा प्रविण वाघ उपस्थित होते.
सदर कार्यक्रम आयोजन आणि यशस्वीतेसाठी आशा स्वयंसेविका सुनंदा सुभाष गोसावी,वंदना अरविंद बोरसे ,अंगणवाडी मदतनीस प्रतिभा शिवाजी पाटील,उपकेंद्र मदतनीस वैशाली शिरसाठ यांनी प्रयत्न केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *