संत नरहरि सोनारांच्या ७४० व्या पुण्यतिथीनिमित्त अमळनेरमध्ये भक्तिमय कार्यक्रम “संत साहित्यामध्ये त्यांचे योगदान मोजके असले तरी अत्यंत मोलाचे” — साहित्यिक भाऊसाहेब देशमुख
![]()
संत नरहरि सोनारांच्या ७४० व्या पुण्यतिथीनिमित्त अमळनेरमध्ये भक्तिमय कार्यक्रम
“संत साहित्यामध्ये त्यांचे योगदान मोजके असले तरी अत्यंत मोलाचे” — साहित्यिक भाऊसाहेब देशमुख
अमळनेर प्रतिनिधी
लाड शाखीय सुवर्णकार समाज, अमळनेर यांच्या वतीने संत श्री नरहरि सोनार यांच्या ७४० व्या पुण्यतिथी निमित्त भव्य आणि भक्तिमय कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी आयोजित व्याख्यानात संत साहित्याचे अभ्यासक साहित्यिक श्री. भाऊसाहेब देशमुख यांनी संत नरहरि सोनार यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत, “त्यांचे संत साहित्यातील योगदान संख्येने कमी असले तरी आशयघन आणि अत्यंत मोलाचे आहे,” असे प्रतिपादन केले.
कार्यक्रम समाजाच्या कै. कलाबाई रामचंद्र शेठ चित्ते सभागृहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी श्री. संजय शेठ मुंडके होते. व्यासपीठावर श्री. सुभाष शेठ पांडव, श्री. दिलीप शेठ चित्ते, डॉ. श्री. दिलीप शेठ श्रीमावळे, श्री. मनोहर दहिवाळ, सर, महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. योगिता डहाळे, तसेच श्रीमती सरोज पांडव, सौ. योगिता मुंडके, सौ. कुमुद नितुकडे, सौ. संगिता चित्ते उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात संत नरहरी महाराजांच्या मूर्तीचे पूजन व माल्यार्पणाने करण्यात आली. समाजातील ज्ञात-अज्ञात दिवंगत बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी श्री. मनोहर शेठ दहिवाळ सर व श्री. अविनाश शेठ चित्ते यांचा सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला. समाजातील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य भेट देऊन प्रोत्साहन देण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात श्री. संजय शेठ मुंडके यांनी “समाज संघटन ही आजच्या काळाची अत्यंत गरज आहे,” असे मत व्यक्त केले. कै. दगडू शेठ पांडव यांच्या स्मरणार्थ श्री. दीपक शेठ पांडव यांच्या हस्ते समाज कार्यालयासाठी १० खुर्च्यांची भेट देण्यात आली.
संत नरहरि सोनार यांच्या आरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मंडळाचे अध्यक्ष श्री. दीपक पवार सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्याध्यक्ष श्री. अविनाश शेठ पांडव, श्री. दिलीप शेठ कुळथे, श्री. अनिल शेठ विंचूरकर, श्री. राजेंद्र शेठ कुळथे, श्री. योगेश शेठ पांडव, श्री. धीरज शेठ विंचूरकर, श्री. राहुल शेठ नितुकडे, उपाध्यक्ष श्री. कुलदीप मुंडके, कोषाध्यक्ष श्री. गिरीष सराफ, चि. तुषार शेठ कुळथे व श्री. अनिल शेठ चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

