प्रताप महाविद्यालय अमळनेर (स्वायत्त) येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाची नाशिक येथे शैक्षणिक सहल संपन्न*
1 min read

प्रताप महाविद्यालय अमळनेर (स्वायत्त) येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाची नाशिक येथे शैक्षणिक सहल संपन्न*

Loading

*प्रताप महाविद्यालय अमळनेर (स्वायत्त) येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाची नाशिक येथे शैक्षणिक सहल संपन्न*

प्रताप महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील तृतीय वर्ष पदवी वर्गाच्या 38 विद्यार्थ्यांनी व 4 प्राध्यापकांनी शैक्षणिक सहलीनिमित्त नाशिक येथील “जय बायोटेक” व “सुला विनीयार्ड “ येथे औद्यागिक भेटीनिमित्त RUSA अंतर्गत अभ्यास दौरा केला. जय बायोटक या नाशिक येथील सातपूर एम.आय.डी.सी स्थित जैविक खतनिर्मिती करणाऱ्या कंपनीस भेट दिली.कंपनीचे व्यवस्थापक श्री.राजपूत यांनी सर्वांचे स्वागत केले. तेथील वरिष्ठ नियंत्रक निलिमा मॅडम यांनी जैविक खत निर्मिती प्रक्रिया टप्या टप्याने कशी केली जाते याची सविस्तर माहिती दिली,तेथे या प्रक्रियेसाठी लागणाऱ्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागातील सर्व यंत्रांची कार्यपद्धती सांगितली. रासायनिकखतांचे दिवसेंदिवस होणारे दुष्परिणाम व त्यामुळे जैविक खतांची वाढत जाणारी मागणी याची माहिती दिली.जैविक खत निर्मिती साठी सुरूवातीला लहान स्तरावर उद्योगाची सुरुवात कशी करता येईल याचेही मार्गदर्शन केले.अतिशय अभ्यासपूर्ण अशा या भेटीनंतर सर्वांनी सोमेश्वर महादेव मंदिरास भेट दिली व तेथून अतिशय निसर्गरम्य ठिकाणी विकसित झालेल्या “सुला” या वाईन इण्डस्ट्री ला भेट दिली.द्राक्षांपासून किण्वण प्रक्रियेने उच्च प्रतीची वाइन कशी बनवली जाते ,त्यासाठी कोणत्या प्रकारची द्राक्ष वापरतात याची माहिती सांगितली.तयार झालेली वाईन दीर्घ मुदतीपर्यंत कशी साठवून ठेवतात हे प्रत्यक्ष दाखविले.या अभ्यासभेटीमुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाने विचार करण्याची क्षमता विकसित होते. या सहलीस सूक्ष्म जीवशास्त्र विभागप्रमुख प्रा.एस.ए.जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली तृतीय वर्ष वर्गातील विद्यार्थी व विभागातील सहकारी प्राध्यापक सहलीत सहभागी झाले.अशा अभ्यास भेटींमुळे विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीस चालना व योग्य मार्गदर्शन मिळते .या अभ्यासदौऱ्याच्या यशस्वितेसाठी विभागप्रमुख प्रा.शशिकांत जोशी,प्रा.भावना महाजन,प्रा.औक्षणी साळुंखे,प्रा कल्याणी पाटील यांनी सहलीत सहभाग घेऊन जबाबदारी सांभाळली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच.डी.जाधव तसेच IQAC समन्वयक डॉ.मुकेश भोळे यांनीही यशस्वीरित्या संपन्न झालेल्या या शैक्षणिक भेटी साठी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *