अमळनेर शहरातील सर्व बिल्डींग मटेरियल दुकाने दर रविवारी बंद राहणार
1 min read

अमळनेर शहरातील सर्व बिल्डींग मटेरियल दुकाने दर रविवारी बंद राहणार

Loading

अमळनेर शहरातील सर्व बिल्डींग मटेरियल दुकाने दर रविवारी बंद राहणार

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेर शहरातील सर्व बिल्डींग मटेरियल विक्रेते व्यापाऱ्यांची नुकतीच धुळे रोडवरील पाठक ट्रेडर्स येथे बैठक पार पडली. या बैठकीत व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींवर सविस्तर चर्चा व विचारविनिमय करण्यात आला. यावेळी सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येत अमळनेर शहर बिल्डींग मटेरियल असोसिएशनची स्थापना करण्याचा निर्णय घेतला.

असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रवीण पाठक, उपाध्यक्षपदी रोहन वाडीले, सचिवपदी हिरामण देवासी तर खजिनदारपदी संतोष पटेल यांची एकमुखाने निवड करण्यात आली.

यानंतर असोसिएशनच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या नियमावली निश्चित करण्यात आल्या. त्यामध्ये शहरातील सर्व बिल्डींग मटेरियल दुकानदारांनी सिमेंटची विक्री एकसमान दराने करणे, तसेच दर रविवारी सर्व बिल्डींग मटेरियल दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयानुसार ग्राहकांनी रविवारी खरेदीसाठी येऊ नये, असे आवाहन असोसिएशनकडून करण्यात आले आहे. रविवार वगळून इतर दिवशी खरेदी केल्यास ग्राहकांची गैरसोय टळेल, असेही स्पष्ट करण्यात आले.

असोसिएशनच्या या निर्णयामुळे व्यापाऱ्यांमध्ये एकवाक्यता निर्माण होऊन व्यवहारात शिस्त व पारदर्शकता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *