ज्ञान, कर्तृत्व आणि सेवाभावाचा संगम  ‘सकल ज्ञान महोत्सव सन्मान व बक्षिस वितरण सोहळा १५ फेब्रुवारी २०२६’ भव्य स्वरूपात**
1 min read

ज्ञान, कर्तृत्व आणि सेवाभावाचा संगम ‘सकल ज्ञान महोत्सव सन्मान व बक्षिस वितरण सोहळा १५ फेब्रुवारी २०२६’ भव्य स्वरूपात**

Loading

ज्ञान, कर्तृत्व आणि सेवाभावाचा संगम

‘सकल ज्ञान महोत्सव सन्मान व बक्षिस वितरण सोहळा १५ फेब्रुवारी २०२६’ भव्य स्वरूपात**

जळगाव प्रतिनिधी : समाजातील शिक्षण, पत्रकारिता, समाजसेवा, आरोग्य, शेती, क्रीडा आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यासाठी आयोजित “सकल ज्ञान महोत्सव सन्मान व बक्षिस वितरण सोहळा २०२६” हा पाचव्या वर्षात पदार्पण करणारा प्रतिष्ठेचा उपक्रम रविवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता अल्प बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे उत्साहात संपन्न होणार आहे.
ज्ञानाचा सन्मान आणि सेवाभावाचा गौरव या दुहेरी हेतूने होणाऱ्या या सोहळ्यास शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची भव्य उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा. श्री. निळकंठ आप्पा गायकवाड (माजी डायट प्राचार्य) मार्गदर्शन करणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. राजुमामा भोळे (आमदार, जळगाव शहर) विराजमान राहणार आहेत. त्यांच्यासोबत सौ. दिपमाला काळे (नवनिर्वाचित महापौर, जळगाव शहर) व मा. श्री. जयश्रीताई महाजन (माजी महापौर, जळगाव शहर व नगरसेविका) यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. विजय पवार (संचालक, ग.स. सोसायटी जळगाव व शिक्षण विस्तार अधिकारी, जि.प. जळगाव), मा. श्री. मनोज पाटील (संचालक, श्री स्वामी समर्थ ग्रुप जळगाव), मा. श्री. केतकीताई पाटील (संचालिका, गोदावरी फाउंडेशन जळगाव), प्रो. रफिक शेख (एच.ओ.डी., डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन, जी.एच. रायसोनी कॉलेज), सौ. भारतीताई काळे (संचालिका, हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट), मा. श्री. सुनील जयसिंग पाटील (आर.सी. पटेल संस्था, शिरपूर), मा. श्री. अॅड. निखिल पाटील (विधी तज्ञ), मा. श्री. संघपाल तायडे (मराठी सिने गायक), सौ. अर्चना माळी (संचालिका, आर्चिज ब्युटी अकॅडमी) आणि सौ. निताताई मंगलसिंग सोनवणे (अध्यक्ष, मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्था व माजी नगरसेविका) यांची उपस्थिती राहणार आहे.
या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार असून त्यामध्ये प्रा. व्ही. एम. चौधरी (ज्ञानवंत मुख्याध्यापक), सौ. पुजा सुमित पंडित (सामाजिक क्षेत्र), श्री. सुनील जयसिंग पाटील (शैक्षणिक क्षेत्र), श्री. दिलीप भारंबे (शैक्षणिक व सामाजिक क्षेत्र), श्री. प्रताप कुमावत (शैक्षणिक क्षेत्र), श्री. दिलीपकुमार जनार्दन जाधव (ज्ञानवंत मुख्याध्यापक), सौ. सुवर्णा अडकमोल (शैक्षणिक क्षेत्र), श्री. योगेंद्र गुलाबराव पवार (शैक्षणिक क्षेत्र), श्री. चंदन पाटील, श्री. अजय भगवान भामरे, श्री. रवि सखाराम मोरे आणि श्री. ईश्वर आर. महाजन (ज्ञानवंत पत्रकार), श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान (संस्था), श्री. चेतन रविंद्र बिरारी (शैक्षणिक क्षेत्र), सौ. निता गोपाळराव वानखेडकर, सौ. भारती तुकाराम ठाकरे, सौ. अलका पितृभवल, सौ. प्रज्ञा नारखेडे (ज्ञानवंत शिक्षिका), सौ. मिनाक्षी सागर भोसले, श्री. रोहित रमेश महाले, श्री. शैलेंद्र ठाकुर, श्री. अॅड. सागर सरोदे, सौ. मनिषा पाटील (सामाजिक क्षेत्र), श्री. ज्ञानेश्वर हिलाल पाटील (आरोग्य सेवक), सौ. छाया हरी नाईक, श्री. सुरेश सिताराम अहिरे, श्री. विजय श्रीराम चौधरी (ज्ञानवंत मुख्याध्यापक), सौ. स्मिता दिलीपकुमार जयकर (शैक्षणिक क्षेत्र), सौ. वंदना काशिनाथ शिर्के (उपमुख्याध्यापिका), श्री. प्रताप सोनवणे, श्री. रमेश गौडू झारखंडे (ज्ञानवंत शेतकरी), डॉ. उदय बेंडाळे व सौ. भारती काळे (आरोग्य दूत), श्री. वसंत पाटील (पर्यावरण क्षेत्र), श्री. सागर सोनवणे (ज्ञानवंत खेळाडू) आणि श्री. दिगंबर दगडू बाविस्कर (ज्ञानवंत शिक्षक) यांचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. किशोर पाटील सर व श्रीमती ज्योतीताई राणे यांचे विशेष सहकार्य लाभत असून विविध शाळांचे मुख्याध्यापक व वृत्तपत्र प्रतिनिधीही या उपक्रमात सक्रिय सहभागी झाले आहेत.
ज्ञानाचा गौरव, सेवाभावाचा सन्मान आणि समाजाला प्रेरणा देणारा हा सोहळा जळगाव जिल्ह्यातील एक प्रेरणादायी सांस्कृतिक व शैक्षणिक पर्व ठरणार असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.
सर्व पुरस्कार्थी बंधू-भगिनींनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन जन्मत प्रतिष्ठान अध्यक्ष पंकज नाले सचिव हर्षाली पाटील मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष सौ नीताताई मंगल सिंग सोनवणे यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *