दहिवदच्या हेमांगी सोनवणे व ऐश्वर्या सोनवणे यांचा नगरसेवकपदी विजय; दहिवद विकास मंचतर्फे गौरवपूर्ण सत्कार
1 min read

दहिवदच्या हेमांगी सोनवणे व ऐश्वर्या सोनवणे यांचा नगरसेवकपदी विजय; दहिवद विकास मंचतर्फे गौरवपूर्ण सत्कार

Loading

दहिवदच्या हेमांगी सोनवणे व ऐश्वर्या सोनवणे यांचा नगरसेवकपदी विजय; दहिवद विकास मंचतर्फे गौरवपूर्ण सत्कार

दहिवद प्रतिनिधी:
दहिवद गावाचे सुपुत्र श्री. अंकुश सोनवणे यांच्या पत्नी सौ. हेमांगी सोनवणे आणि त्यांच्या कन्या कुमारी ऐश्वर्या सोनवणे यांची नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकपदी निवड झाल्याने दहिवद गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर दहिवद विकास मंचच्या वतीने सौ. प्रतिभा देसले (पोलीस पाटील, दहिवद) यांच्या निवासस्थानी हेमांगी सोनवणे व ऐश्वर्या सोनवणे यांचा व त्यांच्या परिवाराचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी गावातील व परिसरातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाला श्री. दिनेश पाटील (मा. सदस्य, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, भारत सरकार), सौ. इ. संगीता दिनेश पाटील (संचालिका, किमया अग्रो सोल्युशन कंपनी, पुणे), श्री. निलेश भदाणे (उपआयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका), सुभाष देसले (मा. उपसभापती, पंचायत समिती अमळनेर), जयवंतराव पाटील (मा. सरपंच), प्रविण माळी (मा. उपसरपंच), देवानंद बहारे (मा. सरपंच), सौ. प्रतिभा देसले (पोलीस पाटील, दहिवद), चंद्रकांत देसले (मा. विस्तार अधिकारी, पं.स. अमळनेर), ईश्वर महाजन (मा. चेअरमन, वि.का. सोसायटी, दहिवद), यशवंत भदाणे, दत्तात्रय देसले, राजेंद्र भदाणे, शिवाजी पारधी (मा. गटनेता, ग्रामपंचायत दहिवद), तसेच अनेक ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.
या वेळी श्री. अंकुश सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. दहिवदचा गौरव सर्वत्र व्हावा, यासाठी प्रयत्नशील राहू.”
सौ. हेमांगी सोनवणे यांनी आपल्या भाषणात म्हटले, “गावाने आमचा एवढ्या मोठ्या प्रमाणात सत्कार केला, हे आमच्या परिवारासाठी अभिमानाची बाब आहे. हा मान आम्ही कधीही विसरणार नाही. ग्रामस्थांच्या प्रेमाचे ऋण आम्ही आयुष्यभर फेडू.”
तसेच श्री. दिनेश पाटील यांनीही आपल्या मनोगतात सांगितले की, “गावातील जे सुपुत्र वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत, त्यांनी सामाजिक कामात सहभाग घेऊन आपल्या गावाचे ऋण फेडावे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुभाष देसले यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्री. शिवाजी पारधी यांनी केले.
गावाच्या प्रगतीचा संदेश देणारा आणि ऐक्याची भावना दृढ करणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *