संसदरत्न खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना अनिल बोरनारे यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा  स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पुस्तक दिलं भेट
1 min read

संसदरत्न खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना अनिल बोरनारे यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पुस्तक दिलं भेट

Loading

संसदरत्न खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना अनिल बोरनारे यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पुस्तक दिलं भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी “भाऊ” म्हणून श्रीकांत शिंदे यांचा करतात उल्लेख

ठाणे (प्रतिनिधी) मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या ठाणे निवासस्थानी जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित “Swatantryaveer Sawarkar’s Work” हे पुस्तक भेट देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ठाणे जिल्ह्यातील आमदार महापौर नगरसेवक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
कल्याण लोकसभा मतदारसंघात शासनाकडून कोट्यवधीचा निधी आणून मतदारसंघातील विविध विकास कामे मार्गी लावण्यात पुढाकार घेणारे, आपल्या लोकसभा मतदारसंघात विकासपुरूष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी “भाऊ” म्हणून उल्लेख करतात

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मे-जून २०२५ मध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) अंतर्गत संयुक्त अरब अमिराती (UAE), काँगो, सिएरा लिओन आणि लायबेरिया या देशांचा १४ दिवसांचा महत्त्वाचा परदेश दौरा केला व ते एका सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत होते, ज्याचा उद्देश दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका मांडणे आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला जागतिक स्तरावर उघडे पाडणे हा होता.
शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न डॉ श्रीकांत शिंदे यांनी मार्गी लावले असून सर्व शिक्षकांच्या वतीने डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना शुभेच्छा दिल्या असे अनिल बोरनारे यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *