हर्सुल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सापडलेल्या मानसिक आजारी २६ वर्षीय महिला दिला मायेचा आधार*,  *हर्सूल पोलीस व ‘सु-लक्ष्मी’ सस्थेची तत्पर मदत पुनर्वसनासाठी केले माणुसकी वृध्द सेवालय येथे दाखल.*
1 min read

हर्सुल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सापडलेल्या मानसिक आजारी २६ वर्षीय महिला दिला मायेचा आधार*, *हर्सूल पोलीस व ‘सु-लक्ष्मी’ सस्थेची तत्पर मदत पुनर्वसनासाठी केले माणुसकी वृध्द सेवालय येथे दाखल.*

Loading

*हर्सुल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सापडलेल्या मानसिक आजारी २६ वर्षीय महिला दिला मायेचा आधार*

*हर्सूल पोलीस व ‘सु-लक्ष्मी’ सस्थेची तत्पर मदत पुनर्वसनासाठी केले माणुसकी वृध्द सेवालय येथे दाखल.*

दिनांक ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी वेडसर वर्तन असलेल्या अवस्थेत भोळसर
अनोळखी महिला बेवारस अवस्थेत गजानन महाराज मंदिर सप्ताहा च्या कार्यक्रमात जोरजोरात ओरडत होती व नागरिकांना शिवीगाळ करतांना आढळून आल्याने मंदिराच्या विश्वस्तांनी लेखी अर्ज हर्सूल पोलीस स्टेशनला दिला.
माहिती मिळताच हर्सूल पोलीस घटनास्थळी पोहोचले असता ती महिला पोलिसांना पाहून घाबरून गेली महिलेची पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता ती काहीही बोलण्यास तयार नव्हती तिला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर तिच्या मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या असल्याचे निष्पन्न झाले.
तीने तीचे नाव माधुरी बाबुराव बच्छिरे वय-२६ वर्षे, रा-मंठा चौफुली जालना. (पुर्ण पत्ता मोबाईल नंबर माहीत नाही) असे घाटितील डॉक्टरांना सांगितले महिला,पत्ता सांगत नसल्यामुळे हर्सुल पोलिसांनी सामाजिक संस्थेची मदत घेतली.‘सु-लक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्था’च्या ‘माणुसकी वृद्ध सेवालय’ (गावंदरी तांडा) येथे तात्पुरत्या निवाऱ्यासाठी तिला रात्री उशिरापर्यंत दाखल करण्यात आले.दाखल केल्यानंतर ती महिला आक्रमक होऊन दगड घेऊन मारण्याचा प्रयत्न करत होती.माणुसकी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी व पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन भोजन दिले आणि औषधोपचार सुरू केला आहे.सदर महिलेच्या नातेवाईकांचा शोध हर्सूल पोलीस घेत आहेत.दरम्यान, तिच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याची जबाबदारी सु-लक्ष्मी संस्थेच्या सौ.पुजा सुमित पंडित व त्यांच्या टीमकडून घेतली जात आहे.या मदतकार्यात मा.प्रवीण पवार साहेब,
पोलीस आयुक्त संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली खालील अधिकाऱ्यांचा मोलाचा सहभाग होता.श्रीमती स्वाती केदार मॅडम पोलीस निरीक्षक हर्सूल,गणेश केदार,शकील शेख,पोलीस उपनिरीक्षक,जयलाल राठोड,शेख रहीम,राकेश देशमुख, निर्मला कोलते मॅडम महिला पो.ह,व माणुसकी वृद्ध सेवालय संचालीका पुजा सुमित पंडित,कार्तीक वाघ सह संस्थेची टीम,मानसिक आजार असलेल्या बेवारस महिलेस दिलेल्या मदतीतून सामाजिक बांधिलकीचे आणि माणुसकीचे उत्तम उदाहरण समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *