विद्यार्थ्यांसाठी तणावमुक्त जीवनाची दिशा , एकाग्रता, मन:शांती व सकारात्मकतेवर डॉ. आदित्य माहेश्वरी यांचे मार्गदर्शन
![]()
विद्यार्थ्यांसाठी तणावमुक्त जीवनाची दिशा
एकाग्रता, मन:शांती व सकारात्मकतेवर डॉ. आदित्य माहेश्वरी यांचे मार्गदर्शन
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथिल खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) याठिकाणी आनंदी कार्यक्रमांतर्गत “तणाव मुक्त जीवन” या विषयावर ३ फेब्रुवारी रोजी १२ ते १ दरम्यान पूज्य साने गुरुजी सभागृहात सर्व विद्यार्थ्यांच्या मनात ऊर्जा निर्माण करणारे व्याख्यान व सराव नुकतेच पार पडले.
यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ.एच डी जाधव,मार्गदर्शक डॉ.आदित्य माहेश्वरी,सेवा निवृत्त प्राध्यापक तथा माजी प्राचार्य डॉ.डी एस भावसार,डॉ.विजय तुंटे उपस्थित होते. प्रस्तुत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान डॉ.एच डी जाधव यांनी भुषविले.
आपल्या मनोगतात डॉ.माहेश्वरी म्हणाले की,एकाग्रता, ध्यान,योगा हे कौशल्य आत्मसात केल्यास आपल्या जीवनात यश मिळेल.यासह आत्मविश्वास, संवाद साधण्याची कला देखिल आत्मसात करणे आवश्यक आहे.
सध्याचे जीवन अस्थिर स्वरूपाचे आहे,त्यासाठी मन शांत ठेवणे आणि आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. “लोका समस्या सुखी नू भंवतू” हे लक्षात घेऊन श्वास द्वारे चेतना व संवेदना स्वीकारणे महत्वाचे आहे.
विद्यार्थ्यांनी आपल्या मनास वर्तमानात आणून श्वासावर व मनावर ताबा मिळविल्यास ऊर्जा निरंतर प्रवाहीत होत असते.ही ऊर्जा अन्न, श्वास, पुरेशी शांत झोप,ध्यानस्त मन याद्वारे उत्पन्न होते म्हणून “जैसा अन्न, तैसा मन” हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
यावेळी डॉ.माहेश्वरी यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.जाधव म्हणाले की,आर्ट ऑफ लिविंग” या उपक्रमाचा लाभ विद्यार्थ्यांना निश्चितच होईल,जीवन-मृत्यू यात एका श्वासाचे अंतर आहे म्हणून अशा उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावे,असे आवाहन केले.
प्रस्तुत कार्यक्रमास ग्रंथपाल दिपक पाटील, प्रा.कैलास बागुल,प्रा.किशोर सोनवणे,प्रा.सोनूसिंग पाटील, डॉ.प्रदीप पवार,प्रा.दिलीप तडवी, प्रा.सचिन आवटे,डॉ.आकाश गव्हाणे, प्रा.भिका पावरा आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.वृषाली वाकडे,डॉ.पुष्पा पाटील,डॉ.नलिनी पाटील,डॉ.अमित पाटील,प्रा.रोहन गायकवाड, डॉ.बालाजी कांबळे,प्रा.अमोल अहिरे,दिलीप शिरसाठ,विशाल अहिरे,अतुल धनगर,नंदूसिंग पाटील,प्रा.हिमांशू गोसावी यांनी सहकार्य केले.
प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभाराची जबाबदारी करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे यांनी पार पाडली.

