शिक्षकांना निवडणुकीच्या कामकाजातून वगळले अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला यश राज्यातील शेकडो शिक्षकांना दिलासा
![]()
शिक्षकांना निवडणुकीच्या कामकाजातून वगळले
अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला यश
राज्यातील शेकडो शिक्षकांना दिलासा
मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेस बसणाऱ्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामकाजातून वगळण्यात आले असून मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांच्या पाठपुरावाला यश आले आहे आहे.
अनिल बोरनारे यांनी याबाबत 30 जानेवारी रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी निवेदन देऊन ही मागणी केली होती
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्वच विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाज करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात शिक्षकांचादेखील समावेश होता. मात्र, सध्या शिक्षक म्हणून कार्यरत असलेले व बढतीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांना केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. ही परीक्षा ऐन पूर्वीच्या वेळापत्रकानुसार मतमोजणीच्या दिवशी तर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीला दोन दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतर मतमोजणीच्या दिवशी होणार आहे. त्यामुळे या शिक्षकांना निवडणुकीचे कामकाज द्यायचे की परीक्षा देण्यास मुभा द्यायची, असा संभ्रम जिल्हा प्रशासनापुढे निर्माण झाला होता.
राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात सर्व बारा जिल्ह्यांमधून अहवाल मागविण्यात आला.
त्यानुसार आता राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या सर्व परीक्षार्थी शिक्षकांना निवडणूक कामकाजातून वगळण्यात आले आहे.
त्यांच्या जागी इतर कर्मचाऱ्यांना नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे

