गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हा खजिनदारपदी पंकज शेटे यांची नियुक्ती
![]()
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हा खजिनदारपदी पंकज शेटे यांची नियुक्ती
अमळनेर | प्रतिनिधी
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ यांच्या वतीने जळगाव जिल्हा खजिनदारपदी पंकज संतोष शेटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघाच्या केंद्रीय समितीच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली आहे.
पत्रकारितेच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण, निष्ठावान व सामाजिक बांधिलकीतून कार्य करणारे पंकज शेटे हे ग्रामीण भागातील विविध समस्या, सामाजिक विषय तसेच जनहिताशी संबंधित प्रश्न सातत्याने मांडत आले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
नियुक्तीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना पंकज शेटे यांनी सांगितले की, “संघटनेने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्न करेन. पत्रकारांच्या हक्कांसाठी लढणे व संघटनेची ताकद वाढवणे हेच माझे प्राधान्य राहील.”
या निवडीबद्दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र व्ही. कदम, संस्थापक सरचिटणीस भगवान सोनार, संस्थापक उपाध्यक्ष रविंद्र पवार, जळगाव जिल्हाध्यक्ष चेतन वाणी तसेच उत्तर महाराष्ट्र संघटक राकेश वाणी यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते व मित्रपरिवाराकडून पंकज शेटे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकार संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

