गणपतींंचे स्मरण करत लोककल्याणासाठी केला उपसंकल्प  श्री मंगळग्रह देवांचा पंचामृतासह रुद्र अभिषेक : आज दुपारी पूर्णाहुती
1 min read

गणपतींंचे स्मरण करत लोककल्याणासाठी केला उपसंकल्प श्री मंगळग्रह देवांचा पंचामृतासह रुद्र अभिषेक : आज दुपारी पूर्णाहुती

Loading

गणपतींंचे स्मरण करत लोककल्याणासाठी केला उपसंकल्प

श्री मंगळग्रह देवांचा पंचामृतासह रुद्र अभिषेक : आज दुपारी पूर्णाहुती

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात राष्ट्रकल्याण, संरक्षण, समृद्धी तसेच संस्थेच्या विविध संकल्पपूर्तीनिमित्त आयोजित तीन दिवसीय भव्य महारुद्र अभिषेक पूजेला काल बुधवार, दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी सुरूवात झालेली आहे. प्रधान आचार्य तथा वेदमूर्ती श्री. केशव पुराणिक गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चैतन्यमय, भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात आज गुरुवार, दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास द्वितीय दिवसातील पूजा सुरू झाली. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले व त्यांच्या धर्मपत्नी सौ. आशाताई महाले यांच्या शुभ हस्ते या विशेष धार्मिक सोहळ्यातील परम पवित्र अनुष्ठान कार्य सुरू आहे. मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे प्रथमच ही तीन दिवसीय भव्य महारुद्र पूजा होत आहे. या महापूजेची शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता पूर्णाहुती होऊन सांगता होणार आहे.
महापूजेत प्रारंभी गणपतींचे स्मरण करण्यात येऊन लोककल्याणासाठी उपसंकल्प करण्यात आला. तसेच काल स्थापित केलेल्या देवतांचे पूजन झाले. यामध्ये गणपती पूजन, वरुण देवता पूजन, मातृका पूजन तसेच न्यास करून श्री मंगळग्रह देवांच्या महारुद्र पूजेचा संकल्प सोडण्यात आला. श्री मंगळग्रह देवांची विविध सुगंधी द्रवांसह पंचामृत व रुद्र अभिषेक तसेच देवांची शृंगार पूजा करण्यात आली. दुपारी स्थापित देवतांचे सायंपूजन करण्यात आले. काही रुद्र आवर्तने झाली. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता महाआरती झाली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. अशा तऱ्हेने द्वितीय दिवसाच्या महापूजेची सांगता झाली. दरम्यान, दुपारी जळगाव विमानतळाचे प्रमुख विमानतळ संचालक मा. श्री. हर्षकुमार त्रिपाठी यांनी महारुद्र पूजास्थळी काही वेळ पूजा-अर्चेत सहभाग नोफ्लदवत श्री मंगळग्रह देवांचे दर्शन घेतले.
वेदमूर्ती व्यंकटेश कळवे गुरुजी, सारंग पाठक, अथर्व कुलकर्णी, शुभम वैष्णव, यश जोशी, चंद्रकांत जोशी, परशुराम शर्मा, तुषार दीक्षित, प्रसाद भंडारी, जयेंद्र वैद्य, मंदार कुलकर्णी, वैभव लोकाक्षी, अक्षय जोशी, गणेश जोशी, पवन शर्मा, विनोद पाठक, दिव्येश जोशी, शैलेश जोशी, उमेश पंचभाई, निलेश रोडे, हेमंत गोसावी, गौरव मिश्रा, सूरज मिश्रा, मनजीत मिश्रा व हरिओम शुक्ल हे पौरोहित्य करीत आहेत. त्यांना उमेश पाठक, प्रवीण भंडारी, चेतन नाईक सहकार्य करीत आहेत.‌‘श्री अष्टोत्तरशत लिंगतोभद्र मंडल‌’ची आकर्षक रेखाटणी
तीन दिवसीय महारुद्र पूजेच्या पूर्णाहुतीसाठीची तयारी रात्री पूर्णत्वास आली. यामध्ये भगवान शंकरांचे १०८ लिंग आणि त्यांच्याशी संबंधित शिवशक्तींची स्थापना केलेले ‌‘श्री अष्टोत्तरशत लिंगतोभद्र मंडल‌’ आकर्षकपणे श्री मंगळग्रह मंदिराच्या समोरील सभामंडपात विविध रंगांतील तांदळात रेखाटून संपूर्ण परिसर फूलमाळांद्वारे सजविण्यात आले आहे. हे सनातन धर्मशास्त्रातील आणि वेदोक्त कर्मकांडातील अत्यंत उच्च कोटीचे, पवित्र आणि शक्तिशाली तांत्रिक-वैदिक मंडल मानले जाते. जेव्हा मोठ्या प्रमाणावर याग, महायज्ञ, रुद्रयाग किंवा विशेष शिव अनुष्ठान केले जाते तेव्हा वेदीवर विविध रंगांच्या तांदळाने किंवा धान्याने हे मंडल रेखाटले जाते. त्याच ठिकाणी भगवान शिवशंकर व माता पार्वती यांच्याही प्रतिमा आकर्षक रूपात उभारण्यात आलेल्या आहेत.
अयोध्या, प्रयागराजच्या पुरोहितांचाही सहभाग
मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात प्रथमच आयोजित तीन दिवसीय महारुद्र पूजेसाठी अयोध्या व प्रयागराज येथून खास पुरोहित निमंत्रित आहेत. यामध्ये गौरव मिश्रा, सूरज मिश्रा, मनजीत मिश्रा व हरिओम शुक्ल यांचा समावेश आहे.
आज दुपारी होणाऱ्या पूर्णाहुतीत अवश्य सहभाग नोफ्लदवा!
भगवान श्री मंगळग्रह देवांची आपल्यावर पूर्ण कृपा व्हावी, सर्वांचे रक्षण व भले व्हावे, या मुख्य उद्देशाने श्री मंगळग्रह मंदिरात अलौकिक अशी महापूजा सुरू आहे. हल्ली जगामध्ये अनावृष्टी सुरू आहे. कुठे पाऊसच पडत नाही. तर कुठे अति पाऊस पडून जलप्रलय होत आहे. अनेक ठिकाणी भयंकर आगींमध्ये अनेकजण होरपळत आहेत. काही ठिकाणी भूकंप, ज्वालामुखी आणि उल्कापातामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. जगावर तिसऱ्या महायुद्धाचे सावट आले आहे. अतिरेकी व देशद्रोह्यांमुळे देशाचे मोठे नुकसान होत आहे. हे जे सर्व इतिभय चालले आहे त्यातून आपल्या परम पवित्र मातृभूमीचे रक्षण व्हावे तसेच जगाचेही कल्याण व्हावे, यासाठी या ‌‘महारुद्र स्वाहाकारा‌’मध्ये श्री मंगळग्रह देव आणि भगवान शंकर यांची आपण आराधना करीत आहोत. मंगळग्रह सेवा संस्था नेहमी विविध स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवत असते. त्यातीलच हा तीन दिवसीय उपक्रम आहे. महारुद्र अभिषेक पूजेत श्री मंगळग्रह मंदिरातील स्वयंभू अतिजागृत मूर्तीवर ११ लघुरुद्र (१३३१ रुद्र आवर्तने) होतील. शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता श्री मंगळग्रह देव मंदिरातील स्थापित सर्व देवतांसाठीचे हवन, बलिदान व पूर्णाहुती होईल. आपण याप्रसंगी पूर्णवेळ थांबलात तर उत्तमच. कारण पूर्ण दिवसभर हवन कार्यक्रम आहे. भाविकांनी या हवनामध्ये दहा मिनिटे का होईना वेळात वेळ काढून या ठिकाणी सहभाग नोफ्लदवावा, असे कळकळीचे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

===========================================
अमळनेर : महारुद्र पूजेचे विशेष यजमान मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले व त्यांच्या धर्मपत्नी सौ. आशाताई महाले तसेच महापूजेचे प्रधान आचार्य तथा वेदमूर्ती श्री. केशव पुराणिक गुरुजी यांच्यासमवेत वेदमूर्ती व्यंकटेश कळवे गुरुजी, सारंग पाठक, अथर्व कुलकर्णी, शुभम वैष्णव, यश जोशी, चंद्रकांत जोशी, परशुराम शर्मा, तुषार दीक्षित, प्रसाद भंडारी, जयेंद्र वैद्य, मंदार कुलकर्णी, वैभव लोकाक्षी, अक्षय जोशी, गणेश जोशी, पवन शर्मा, विनोद पाठक, दिव्येश जोशी, शैलेश जोशी, उमेश पंचभाई, निलेश रोडे, हेमंत गोसावी, गौरव मिश्रा, सूरज मिश्रा, उमेश पाठक, प्रवीण भंडारी व चेतन नाईक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *