सुभेदार रामजी सकपाळ संविधान निर्मात्याचा जाणता बाप !!!
1 min read

सुभेदार रामजी सकपाळ संविधान निर्मात्याचा जाणता बाप !!!

Loading

सुभेदार रामजी सकपाळ संविधान निर्मात्याचा जाणता बाप !!!

महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात आंबवडे नावाचे गाव आहे. अशा गावात मालोजी सकपाळ नावाचे गृहस्थ राहत होतो.ते इंग्रज सैन्यामध्ये शिपाई होते. त्यांच्या नात्यातील लोक इंग्रज सैन्यामध्ये काम करीत होते. मालोजी सकपाळ यांनी आपल्या रामजी नावाच्या मुलाला इंग्रजी शिक्षण देऊन सैन्यामध्ये भरती केले. त्यावेळी महार समाजातील अनेक लोक सैनिक म्हणून काम करीत असल्याने महार बटालियन नावाची सेना इंग्रजांच्या सेवेला होती. कालांतराने महार बटालियन इंग्रजांनी बंद केली होती. महार नाव जरी त्या बटालियनचे असले तरी त्यामध्ये एस.सी प्रवर्गातील व एस.टी प्रवर्गातील सैनिक यांचा समावेश त्यात होता. सुभेदार रामजी सकपाळ नंतर ते रामजी आंबेडकर झालेत. इंग्रजी व मराठी या विषयावर त्यांचे प्रभुत्व होते. घरामध्ये मालोजी रावापासून धार्मिक वातावरण होते. रामजी सकपाळ यांना शिक्षणाची आवड होती. आपल्या मुलांना शिक्षणासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घरामध्ये रामायण, महाभारत यासारखे ग्रंथ वाचावयास मिळाले. परंतु ज्यावेळी बाबासाहेबांचे वडील कबीरपंथाकडे वळले त्यावेळी त्यांच्या विचारसरणीमध्ये वेगळा बदल झाला. सुभेदार रामजी आंबेडकर हे विवेकी व चिकित्सक विचार करू लागले. संत कबीर, नामदेव, संत रविदास यांच्या भजनाचा त्यांच्यावर सकारात्मक परिणाम झाला. भारतामध्ये चाललेल्या जातीभेदाबद्दल त्यांना तीव्र संताप येत होता. कबीर पंथाच्या सत्संगासाठी रामजी आंबेडकर भीमराव आंबेडकर यांना घेऊन जात असत. त्यामुळे बाबासाहेबांच्या जीवनाची दिशा बदलली.
सुभेदार रामजी आंबेडकर यांना शिक्षणाबद्दल आस्था होती. त्यामुळे आपल्या मुलाला उत्तम शिक्षण मिळण्यासाठी त्यांनी आपल्या मुलीचे दागिने विकून बाबासाहेबांचे शिक्षण पूर्ण केले. बाबासाहेबांना या जाणत्या बापाने सर्व प्रकारचे ज्ञान घेण्यासाठी प्रवृत्त केले. संघर्षातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्ञान घेण्याची असीम इच्छा निर्माण झाली. बाबासाहेबांना शिक्षणासाठी प्रेरणा देणारे पहिले गुरू त्यांचे वडील होते. बाबासाहेबांना त्यानंतर वैचारिक गुरु म्हणून गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा फुले लाभले. पुरोगामी विचाराची खरी ठिणगी बुद्धाच्या बक्षीस मिळालेल्या पुस्तकातून पडली. कबीराच्या सत्संगाने मानवतेची शिडी मिळाली. ब्रिटिश सैन्यामध्ये सैनिकांना शिकवण्याचे काम सुभेदार रामजी आंबेडकर यांना मिळाले. त्याचवेळी त्यांची भेट महात्मा फुले यांच्याशी झाली. त्यामुळे सत्यशोधक विचाराचा पाया रामजी आंबेडकरांच्या जीवनामध्ये भक्कम झाला. एका बापाने आपल्या मुलाला शिक्षणासाठी प्रेरणा दिली. पुस्तक घेण्यासाठी लोकांकडून उसणवार पैसे घेऊन बाबासाहेबांची पुस्तकाची भूक भागवली.
अज्ञानरुपी अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची वाट या जाणत्या बापाने आपल्या मुलासाठी निर्माण केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आई वाढल्यावर बाबासाहेबांना आईची उणीव भासू दिली नाही. अशा या बापाच्या बापाचा स्मृती दिवस आहे. असा बाप सर्वांना मिळत नाही. अशा वैचारिक वृत्तीने जगणारा बाप बाबासाहेबांना मिळालेला होता. सुभेदार रामजी आंबेडकरांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

सोपान भवरे सर

विशेष प्रतिनिधी

मराठी लाईव्ह न्युज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *