शिवजयंती उत्सवासाठी अमळनेर सजणार दिमाखात  नाट्यमंदिर सजावट व विद्युत रोषणाईसाठी नगरपरिषदेला निवेदन
1 min read

शिवजयंती उत्सवासाठी अमळनेर सजणार दिमाखात नाट्यमंदिर सजावट व विद्युत रोषणाईसाठी नगरपरिषदेला निवेदन

Loading

शिवजयंती उत्सवासाठी अमळनेर सजणार दिमाखात

नाट्यमंदिर सजावट व विद्युत रोषणाईसाठी नगरपरिषदेला निवेदन

अमळनेर प्रतिनिधी :
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर शहर यावर्षीही उत्साह, श्रद्धा आणि अभिमानाने न्हाऊन निघणार आहे. दिनांक १९ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात भव्य कार्यक्रम, मिरवणुका आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, तालुकाभरातून हजारो शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत.
या पार्श्वभूमीवर अमळनेर नगरपरिषदेला विशेष निवेदन देण्यात आले आहे. शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रकाशमय दिसावे यासाठी विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. विशेषतः —

शहरातील सर्व प्रमुख रस्ते व परिसरांची स्वच्छता

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिराची आकर्षक सजावट

संपूर्ण परिसरात भव्य विद्युत रोषणाई

सर्व पथदिवे कार्यरत ठेवणे

शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची पॉलिशिंग व स्वच्छता

या मागण्यांची तातडीने पूर्तता केल्यास शिवजयंती उत्सव अधिक दिमाखात साजरा होईल आणि अमळनेर शहराचा लौकिक वाढेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी सार्वजनिक शिवजयंती समितीचे सदस्य अमर सोनार, राकेश शेटे, पंकज भोई, उज्ज्वल पाटील, पारस धाप, अभिषेक सोनार, गोकुळ पाटील, आशिष अंधारे, राहुल अहिरे, शुभम पाटील, मोहित पाटील तसेच युवा सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाणे उपस्थित होते.
शिवभक्तांच्या या मागण्यांकडे नगरपरिषद प्रशासन सकारात्मक दृष्टीकोनातून पाहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *