माझ्या नावाने फिरणारे पोस्टर बनावट” — आमदार अनिल पाटील यांची स्पष्ट भूमिका
1 min read

माझ्या नावाने फिरणारे पोस्टर बनावट” — आमदार अनिल पाटील यांची स्पष्ट भूमिका

Loading

🔴 “माझ्या नावाने फिरणारे पोस्टर बनावट” — आमदार अनिल पाटील यांची स्पष्ट भूमिका

अमळनेर प्रतिनिधी :
सध्या सोशल मीडियावर आमदार अनिल पाटील (अनिल दादा) यांच्या नावाने एक पोस्टर व्हायरल होत असून, त्या पोस्टरमधील मजकूर व संदेश यांचा स्वतःशी कोणताही संबंध नसल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले आहे. काही अपप्रवृत्तींकडून जाणूनबुजून चुकीची माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

आमदार अनिल पाटील यांनी दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की,

“माझ्या नावाने सोशल मीडियावर फिरत असलेले पोस्टर पूर्णपणे बनावट व दिशाभूल करणारे आहे. त्यातील विचार, विधान किंवा संदेशाशी माझा काहीही संबंध नाही. समाजात संभ्रम निर्माण करणे व माझी प्रतिमा मलिन करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे.”
त्यांनी पुढे नागरिकांना आवाहन केले की, कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता तपासावी. अशा खोट्या व अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच अधिकृत माहिती केवळ त्यांच्या अधिकृत माध्यमांतूनच घ्यावी.
या प्रकारामुळे राजकीय व सामाजिक वातावरण ढवळून निघण्याची शक्यता लक्षात घेता संबंधित घटकांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याबाबतही त्यांनी संकेत दिले आहेत.

जनतेस आवाहन:
खोट्या पोस्टर, अफवा आणि दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहा. अधिकृत माहितीशिवाय कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *