अल्पसंख्याक शाळांतील “नो वर्क नो पे” निर्णय अखेर मागे,  अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला यश
1 min read

अल्पसंख्याक शाळांतील “नो वर्क नो पे” निर्णय अखेर मागे, अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला यश

Loading

अल्पसंख्याक शाळांतील “नो वर्क नो पे” निर्णय अखेर मागे

अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई (प्रतिनिधी) अल्पसंख्याक शाळातील अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेलं “नो वर्क नो पे” चा नियम अखेर मागे घेण्यात आला असून शिक्षक नेते अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे

दि. 13 जुलै 2016 रोजी शासन निर्णय निर्गमित करून “नो वर्क नो पे” धोरण लागू करण्यात आले होते. मागील काही वर्षांपासून अल्पसंख्यांक शाळांमधून अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांचे समायोजन होईपर्यंत वेतन मिळत नव्हते. यासंदर्भात अनिल बोरनारे यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्री यांच्याकडे निवेदन पाठपुरावा करत होते या पाठपुराव्यामुळे शिक्षण विभागाने 30 जानेवारी 2026 रोजी शासन निर्णय निर्गमित करून नो वर्क नो पे चे धोरण मागे घेतलेले आहे. त्यामुळे अल्पसंख्यांक शाळातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नो वर्क नो पे धोरण मागे घेतल्यामुळे अतिरिक्त ठरल्यानंतरही अल्पसंख्याक शाळातील शिक्षक कर्मचाऱ्यांना नियमितपणे वेतन मिळणार असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *