लोकनेते स्व.अजितदादा पवार यांचे नांव पाडळसरे धरणाला द्यावे हिच खरी श्रद्धांजली -संदिप घोरपडे
1 min read

लोकनेते स्व.अजितदादा पवार यांचे नांव पाडळसरे धरणाला द्यावे हिच खरी श्रद्धांजली -संदिप घोरपडे

Loading

लोकनेते स्व.अजितदादा पवार यांचे नांव पाडळसरे धरणाला द्यावे हिच खरी श्रद्धांजली -संदिप घोरपडे

अमळनेर प्रतिनिधी –

आज पातोंडा येथे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री,लोकनेते स्व. अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली सर्व पक्षीय सभेच्या माध्यमातून देण्यात आली.यावेळी प्रथमतः लाडक्या नेत्याच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्या नंतर सामाजिक कार्यकर्ते श्री.संदिप घोरपडे यांनी श्रद्धांजली वाहताना अजित दादा पवार यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना सांगितले कीत्यावेळी बोलताना संदीप घोरपडे यांनी माननीय नामदार अजित पवार यांना श्रद्धांजली वाहताना त्यांची एकूण झालेली जडणघडण जाणता राजा शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत झाली त्यांचा लोकसंग्रह त्यांची कामाची हातोटी याचा त्यांनी पुरेपूर वारसा चालविला मात्र फक्त समाजकारण आणि राजकारण स्वीकारून कला साहित्य काव्य शास्त्र विनोद याकडे फारसे लक्ष न दिल्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधील मुत्सद्येगिरी ही आवर्जून पुढे आली नाही त्यामुळे त्यांचे मुख्यमंत्री पद हुकले अशी खंत व्यक्त केली अमळनेरच्या नाट्यगृहाला निर्मितीच्या काळात नगर विकास मंत्री राजेश टोपे यांना आदेशित करून संदीप घोरपडे या सामान्य कार्यकर्त्याचा हट्ट पुरविला व वैशिष्ट्यपूर्ण योजनेमध्ये नाट्यगृहाच्या भरीव निधी ची व्यवस्था करून नाट्यगृह पूर्णत्वाकडे जाण्याची काळजी घेतली आपण सर्वांनी असा नेता गमावला आहे की त्याची भरपाई कोणी ही करू शकत नाही, महाराष्ट्रातील असे नेतृत्व क्वचित ची सापडले जे वेळेला, शब्दाला, कार्याला जागत होते.तसेच पातोंडा गावातील गावकऱ्यांना ग्रामसभेमध्ये पाडळसे धरणाला अजित डॅम असे नाव द्यावे असा ठराव करण्याचे आवाहन केलेतसेच पाडळसरे गावकऱ्यांना व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना आपापल्या गावातून तशा प्रकारचे ठराव करून पाडळसे धरणाला माननीय नामदार अजित रावजी पवार यांचे अजित ड्याम हे नामकरण करावे असा आग्रह करण्याची विनंती व यानेच आपली खरी श्रद्धांजली अजितदादांना राहील अशी भावना मांडल्याने उपस्थितांनी देखील याला भरीव समर्थन दिले यावेळी दादासो,संदिप घोरपडे, दादासो.भागवत पाटील,रघुनाथ दादा संदानशिव, महेंद्र अण्णा बोरसे, समाधान भाऊ धनगर,वसुंधराताई लांडगे,प्रणव चौधरी,अमित पवार सर, महेंद्र पाटील सर पातोंडा,भटूदादा बाविस्कर, प्रविण लाड.यांनी सुध्दा श्रद्धांजली अर्पण केली.आणि कार्यक्रमासाठी पातोंडा ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *