प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय हिंदी संगोष्ठी उत्साहात संपन्न संवैधानिक भारत व अस्मितामूलक हिंदी साहित्यावर देशभरातील विद्वानांचे चिंतन
![]()
प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय हिंदी संगोष्ठी उत्साहात संपन्न
संवैधानिक भारत व अस्मितामूलक हिंदी साहित्यावर देशभरातील विद्वानांचे चिंतन
अमळनेर प्रतिनिधी
प्रताप स्वायत्त महाविद्यालयाच्या स्नातकोत्तर हिंदी विभागा मार्फत राष्ट्रीय स्तरावरील एक दिवसीय संगोष्टीचे आयोजन करण्यात आले होते. विषय होता- ‘संवैधानिक भारत का अस्मिता मूलक- विमर्षकेंद्री हिंदी साहित्य’. या आयोजनात देशातील विविध महाविद्यालयातून विषय तज्ञ, विचारवंत,प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी सहभागी झाले होते. देशभरातून जवळ-जवळ सत्तर हुन अधिक प्राध्यापकांनी नाव नोंदणी केली.
कार्यक्रमांची सुरुवात दीप प्रज्ज्वलन व श्रीमंत प्रताप शेठ जी. पूज्य साने गुरुजी व विश्व् रत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.
याप्रसंगी उदघाटन सत्राची नांदी खा. शि. मंडळाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल, संचालक योगेश मुंदडे, कार्याध्यक्ष नीरज अग्रवाल, कार्योपाध्यक्ष जितेंद्र जैन प्र.प्राचार्य एच. डी. जाधव यांच्या उपस्थितीने झाली. यावेळी केंद्रीय विद्यापीठ हैद्राबाद इथून विशेष पाहुणे म्हणून उपस्थित मा. प्रो. डॉ. भगवान गव्हाडे यांचे महत्वपूर्ण बीज भाषण झाले. संगोष्ठी उदघाटक म्हणून विसरवाडी (नंदुरबार) महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.जयश्री गावित यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून, राष्ट्रीय आयोजनाचे उदघाटन केले.राष्ट्रीय संगोष्ठी चे मुख्य संयोजक प्रो.डॉ.शशिकांत सोनावणे ‘सावन’ यांनी राष्ट्रीय आयोजनाची भूमिका विषाद केली.प्रो.डॉ.कुबेर कुमावत यांनी अतिथि परिचय करून दिला.प्रमुख पाहुणे प्रो.मधुकर खराटे, पूर्व अधिष्ठाता, क. ब. चौ. उ. म. वि. जळगावव प्रो.संजयकुमार शर्मा,अध्यक्ष,हुंडई अध्ययन मंडल यांची ही उपस्थिती महत्वपूर्ण होती. उपस्थित सर्व प्राध्यापक, शोधार्थी विद्यार्थ्यांनी आपापले संशोधन, शोध पत्र वाचन केले.चार सत्रात अम्बेडकवादी/दलित, आदिवासी, स्त्री,किन्नर व सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडित विविध साहित्यिक विषयावर संवैधानिक दृष्टिकोनातून साधक-बाधक चर्चा घडून आल्या. प्रो.महेंद्रकुमार वाढे,प्रो.डॉ. पंढ़रीनाथ पाटील,प्रो.जिजाबराव पाटील,प्राचार्य नाना गायकवाड़, प्रो.अंशुमान मिश्र, प्रो.आशा काम्बले, डॉ.राहुल संदानशिव,प्रो.संजय रनखांबे,डॉ.शैलजा माहेश्वरी यांनी अस्मितामूलक हिंदी साहित्यावर विशेष प्रस्तोता व सत्राध्यक्ष च्या भूमिकेतुन विषय प्रवर्तन केले.या प्रसंगी देशभरातून प्राप्त झालेल्या दर्जेदार शोध निबंधांचे अंतर्राष्ट्रीय जर्नल चे मान्यवारांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले. सर्वोत्कृष्ट शोधनिबंधां ना पुरस्कार प्रदान करण्यात आलेत.या संगोष्ठी च्या माध्यमातून पुन्हा नव्या दृष्टीने अस्मितामूलक साहित्य या अव्यक्त विषयावर चिंतन होने गरजेचे आहे ह्या निष्कर्षा प्रत राष्ट्रीय संगोष्ठीत विचारविनिमय झाला.
देशभरातून आलेल्या पाहुण्यांची निवास-भोजनची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. समापन सत्रात खा. शि. मंडळाचे उपाध्यक्ष कमल आसकरण कोचर व संचालिका लिना प्रवीण पाटील उपस्थित होते. आपल्या अध्यक्षिय भाषणात प्राचार्य जाधव यांनी सम्मेलनाच्या सफल आयोजनाबाबत आनंद व्यक्त केला व भविष्यात ही अश्या आयोजनां साठी योग्य ती मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रो.डॉ.कल्पना पाटील,प्रो योगेश पाटील, डॉ.मस्तान शाह,डॉ.अनिता राजवंशी, डॉ. क्रांति सोनवणे,प्रवीण पवार यांनी केले सम्मेलन यशस्वीते साठी व राष्ट्रीय गिंडी संगोष्ठी संयोजक व हिंदी विभागाध्यक्ष प्रो. डॉ. शशिकांत सोनवणे ‘सावन’, सह संयोजक प्रो. डॉ. कुबेर कुमावत, उप प्राचार्या प्रो. डॉ. कल्पना पाटील, सहा. प्रा. कैलास बागुल व सहा. प्रा. किशोर सोनवणे,सहा प्रा.सुनील सपकाले, डॉ.आर सी सरवदे यांनी अथक मेहनत घेतली तसेच प्रताप महाविद्यालयाचे प्राध्यापक सहकारी व कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले. शेवटी वायोलीन वर वाजविलेल्या राष्ट्र गीताच्या धून वर कार्यक्रमाची सांगता झाली.

