जिल्हाधिकारी कार्यालयात 02 फेब्रुवारी रोजी* *लोकशाही दिनाचे आयोजन*
1 min read

जिल्हाधिकारी कार्यालयात 02 फेब्रुवारी रोजी* *लोकशाही दिनाचे आयोजन*

Loading

*जिल्हाधिकारी कार्यालयात 02 फेब्रुवारी रोजी*
*लोकशाही दिनाचे आयोजन*

*जळगाव, दि. 29 (जिमाका) — :* दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दिनांक 02 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात आयोजित करण्यात आलेला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी दिली आहे.

तरी नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज केलेला असेल आणि सदरहू अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळालेले नसेल अशाच वैयक्तिक हितसंबधाबाबतच्या तक्रारी घेऊन या लोकशाही दिनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *