खडके गावासाठी गौरवाची थाप!!! प्रेरणा देणारे बळ!!! सौ तृप्ती मनोज (जयदीप) पाटील पोलीस पाटील खडके तालुका अमळनेर
![]()
खडके गावासाठी गौरवाची थाप!!!
प्रेरणा देणारे बळ!!!
सौ तृप्ती मनोज (जयदीप) पाटील पोलीस पाटील खडके तालुका अमळनेर
अमळनेर प्रतिनिधी
महसूल प्रांत कार्यालय अमळनेर तालुका अमळनेर व पोलीस स्टेशन अमळनेर यांच्या वतीने उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्कार सौ तृप्ती मनोज पाटील पोलीस पाटील खडके तालुका अंमळनेर यांना प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी अमळनेर तालुक्याचे आमदार अनिल दादा पाटील, माननीय जयश्रीताई पाटील, डी वाय एस पी माननीय विनायक कोते साहेब, नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर साहेब, प्रांताधिकारी मयूर भंगाळे साहेब, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा साहेब, पीएसआय माननीय दत्तात्रय निकम साहेब, उपस्थित होते. हा सन्मान केवळ माझा नाही तर संपूर्ण खडके गावाची प्रतिष्ठा व अभिमान आहे. “उत्कृष्ट पोलीस पाटील” हा मानाचा पुरस्कार मिळाला ही माझी नाही तर संपूर्ण खडके गावाची प्रतिष्ठा आहे. या सर्व कर्तव्यनिष्ठ आणि कर्तव्यदक्ष लोकसेवेसाठी सदैव तत्पर राहील माझ्यासाठी एक मोठी सामाजिक जबाबदारीची आणि प्रेरणादायीची ही खरी बाब आहे असे सौ तृप्ती मनोज (जयदीप)पाटील पोलीस पाटील खडके यांनी सांगितले.

