कृषी विद्यालय पिलखोड येथे २००५ बॅचचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न !..  तब्बल २० वर्षानंतर एकत्र आले मित्र – मैत्रीणी !…..
1 min read

कृषी विद्यालय पिलखोड येथे २००५ बॅचचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न !.. तब्बल २० वर्षानंतर एकत्र आले मित्र – मैत्रीणी !…..

Loading

कृषी विद्यालय पिलखोड येथे २००५ बॅचचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न !..

तब्बल २० वर्षानंतर एकत्र आले मित्र – मैत्रीणी !…..

तालुका प्रतिनिधी – पी डी पाटील सर

पिलखोड : कृषी विद्यालय पिलखोड येथे कृषी पदवीका २००५ – २००७ बॅचचे गेट-टू-गेदर स्नेहसंमेलन दि.२५ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. प्रास्ताविक पंकज पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य आर एस महाजन होते. गुरुवर्य के बी बाविस्कर व पी यू महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी गुरुवर्यांना महापुरुषांचे अनमोल ग्रंथ भेट देण्यात आले. सर्व मित्र-मैत्रिणींना या स्नेहसंमेलन प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांची मुर्ती भेट स्वरूपात देण्यात आली.
याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या. विश्वजीत बागुल, विकास होनमाने, दुर्गेश जाधव, अविनाश वाबळे, अमोल पाटील, शिवाजी पवार, सुनील पाटील,संदीप सुरवाडे,योगेश पाटील, शुभांगी पाटील, दर्शना हिवाळे, वैशाली पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पंकज पाटील व सौ.योगिता वाघ यांनी प्रभावीपणे केले तर आभार हरीश मोरे यांनी मानले. स्नेहसंमेलनामुळे सर्व मित्रमैत्रिणींना २० वर्षानंतर पुन्हा एकत्र येण्याची संधी मिळाली असून मैत्रीचे नाते अधिक घट्ट झाले.

🖼️ फोटो कॅप्शन :
कृषी विद्यालय पिलखोड येथे पार पडलेल्या २००५ -२००७ बॅचच्या गेट-टू-गेदर स्नेहसंमेलनात सहभागी माजी विद्यार्थी व मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *