लेखणीच्या सन्मानाचा पार पडलेला पारिवारीक भावनिक उपक्रम…सर्व पत्रकार बांधवांना धन्यवाद!  लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा पत्रकार दिन आणि पत्रकार सन्मान समारंभ.‌…अकोला येथून पहिला प्रायोगिक उपक्रम!
1 min read

लेखणीच्या सन्मानाचा पार पडलेला पारिवारीक भावनिक उपक्रम…सर्व पत्रकार बांधवांना धन्यवाद! लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा पत्रकार दिन आणि पत्रकार सन्मान समारंभ.‌…अकोला येथून पहिला प्रायोगिक उपक्रम!

Loading

लेखणीच्या सन्मानाचा पार पडलेला पारिवारीक भावनिक उपक्रम…सर्व पत्रकार बांधवांना धन्यवाद!

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा पत्रकार दिन आणि पत्रकार सन्मान समारंभ.‌…अकोला येथून पहिला प्रायोगिक उपक्रम!

बंधूतुल्य पत्रकार मित्र आणि उपस्थित ज्येष्ठ मार्गदर्शक पत्रकार महर्षींची आनंददायी उपस्थिती!

सतत विसंगती… विषमता… अन्याय…अत्त्याचार…
अनाचाराविरूध्द लेखणीचा संघर्ष आणि शासन, प्रशासनाला सेवा देत धावणारा पत्रकार…!”राष्ट्राचा चौथा आधारस्तंभ” म्हणून राजकीय बोलघेवड्यांकडून त्याची स्तूती फक्त ऐकतो आहे.पण मुल्यमापन,दखल,आदर आणि स्नेहभावना तर नाहीतच.उलट दृष्टीदोषातून समोर येणारा तुसडेपणाच फक्त त्याने पाहिलेला असतो.वापर करून व्यापार करणारे सौदागर भरपूर असतात.परंतू जी खंत आमच्या या मित्रांच्या मनात सतत असते,ती वर्षानुवर्षे दुर झालेली नाही.हे दु:ख फक्त फक्त जमिनीवर पाय असणाऱ्या सर्वसामान्न्यांचे आहे,पंचतारांकीतांचे नाही.त्यांना खाली पाहण्याची गरजच कधी वाटली नाही आणि वाटणारही नाही.

अहोरात्र समाज,शासन,प्रशासनाची कर्तव्याच्या योगदानातून नुसती सेवाच करत राहणाऱ्या अशा आमच्या पत्रकारांचा आपल्या घरात,आपल्याच माणसांकडून तरी सन्मान व्हावा…आदर आणि प्रेमभावनांची देवाणघेवाण व्हावी म्हणून लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या अकोला येथून स्थापन झालेल्या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेने अकोला जिल्हा कार्यकारिणीच्या सहकार्यांने पत्रकार दिनी अकोल्यातील पत्रकारांना “लोकस्वातंत्र्य पत्रकार भूषण सेवा गौरव” व “लोकस्वातंत्र्य प्रभावी पत्रकारिता सेवा गौरव” या राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्याचा एक उपक्रम राबविला होता.संघटना राष्ट्रीय असली तरी,अकोला मुख्यालय असल्याने येथे हा पहिला कार्यक्रम आयोजित केला‌.असेच कार्यक्रम कार्यक्रम लोकस्वातंत्र्य पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्या जिल्ह्यातून घडवून आणावेत.तशा प्रेरणा निर्माण व्हाव्यात हा उध्देश यामागे आहे.तसे आवाहनही या निमित्ताने करण्यात आले.हा पारिवारीक स्नेहमिलन मेळावा होता‌. जात… पात… धर्म… पंथ… संघटना … लहान… मोठा, या भेदांपलिकडे जाऊन सर्वांना आपुलकीच्या भेदातित आणि उदात्त स्नेहभावनांनी भेटण्याचा हा एक स्नेहमिलन मेळावा होता.आद्य पत्रकार स्व.बाळशास्त्री जांभेकर आणि महापुरूष, समाजसुधारकांना स्मरून नव्या संकल्पांना उर्जा देणारा हा समारंभ होता.याप्रसंगी जाणीवांना स्पर्श होऊन नव्या प्रेरणांचे बळ मिळावे यासाठी “समाजाला अपेक्षित असणारा पत्रकार कसा असावा” या कर्तव्य मार्गदर्शनपर परिसंवादाचे आयोजनही करण्यात आले होते.

ईतर राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना सुध्दा कार्यक्रमांच्या अध्यक्षपदाचा सन्मान देणे ईतरांना प्रमुख उपस्थितीत घेणे.हा लोकस्वातंत्र्यचा समतावादी दृष्टीकोण आहे. त्याचे पालन नेहमी असते.त्यानुसार पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात लोक स्वातंत्र्य राष्ट्रीय उपाध्यक्ष,ज्येष्ठ पत्रकार मा.प्रदिप खाडे हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.यावेळी अकोला येथील ज्येष्ठ पत्रकार मा.दिनेश शुक्ल,प्रा.मोहन खडसे,महेन्द्र कवीश्वर,अकोला जिल्हा माहिती अधिकारी मा.हर्षवर्धन पवार खामगांवचे ज्येष्ठ पत्रकार जगदिश अग्रवाल,सागर मोदी, आमची भगिनी निशाली पंचगाम हे विचारमंचावर उपस्थित होते.यावेळी ४० पत्रकारांना पुरस्कार सन्मानचिन्ह,शाल व पुष्पगुच्छ प्रदान करून आदरयुक्त प्रेमभावनांनी सन्मानित करण्यात आले.वैयक्तिक कारणांनी काही जण त्यावेळी उपस्थित नव्हते.त्यांना लोकस्वातंत्र्यच्या दि.२५ जानेवारीच्या ५३ व्या मासिक विचारमंथन व स्नेहमिलन मेळाव्यात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.मागील वेळी दैनिक सुफ्फाचे संपादक मा.हाजी सज्जादभाई हुसैन हे उपस्थित नव्हते.त्यांनी याप्रसंगी विचारमंचावर हजेरी लावली.त्यांनाही सन्मानित करण्यात आले.या सोहळ्यात अकोल्याबाहेरील काही मोजके पत्रकार पण होते. एकंदरीत पत्रकारांच्या भरगच्च उपस्थितीत गप्पा गोष्टीतून आनंद लूटत स्नेहभोजनाने या कार्यक्रमाची त्यादिवशी ६ जानेवारीला सांगता झाली.नंतरचे पुरस्कार २५ च्या विचारमंथन मेळाव्यात देण्यात आले.दर महिण्याचे कार्यक्रम ही संकल्पना राबविली गेल्याने ती एक चांगली उपलब्धी लोकस्वातंत्र्यकडे आहे.त्यात राहिलेली कामे पूर्ण करता येतात.हा कार्यक्रम पत्रकार महासंघांच्या पदाधिकारी आणि सभासदांच्या अशा आर्थिक सहयोगातून होता.यापूर्वी सुध्दा संघटनेची स्वत:ची साउंड सिस्टीम,पोडियम हे सभासदांच्या अशाच अल्पशा मदतीतून विकत घेतलेलं आहे.फक्त पारदर्शकता, वागण्यातील समानता आणि परस्परांप्रती प्रेमभावना यामुळेच हे शक्य होत आहे.काही लोकस्वातंत्र्य सभासद विशिष्ट विचार आणि ध्येयाच्या एका चौकटीत स्वत:चा परिचय सिध्द करीत आहेत.पत्रकार आणि समाज हक्काच्या संघर्षक चळवळीसोबतच समस्यानिर्मुलनासाठी शासनाकडे नेहमी दाद मागत राहणे,तथा कल्याण आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया,आरोग्य शिबीरे,मदतीचे कार्यक्रम असे सामाजिक उपक्रम पण संघटनेकडून सतत राबविले जात आहेत.समाजिक आशीर्वादाच्या बळाने हे सारे शक्य होत आहे.

ज्योत से ज्योत लगाते चलो….प्रेम की गंगा बहाते
चलो” या उदात्त संदेशाने चालत राहण्याचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा मानवतावादी अभिनव प्रवास आहे. परिवारातील सभासद आणि आप्तास्वकियांना बाहेरील जगतात कितीही यश आणि सन्मान मिळत असले तरी आपल्या घरातील लोकांकडून आपल्या कष्टाचे, कर्तव्यधर्माच्या साधनेचे मुल्यमापण होत रहावे,आपली दखल घेतली जावी.सकारात्मक स्नेहभावनांचे बळ मिळत रहावे ह्या नैसर्गिक भावना असतात.त्यामुळेच तो कसा होतो,कशा स्वरूपात होतो,कुणाकडून होतो,या विचारांना याठीकाणी थारा नसतो.त्यामागील उदार मानवतावादी भावना महत्वाच्या असतात.आणि त्याच प्रबळ शक्ती प्रत्येक माणसाला आयुष्यात मोठेपण मिळवून देणाऱ्या अदृश्य शक्ती असतात‌.म्हणून ईतर कोणत्याही आदर आणि सन्मानापेक्षा आपल्याच माणसांनी घरातून केलेले घरातील सन्मान हे ईतर कोणत्याही सन्मानापेक्षा मोठे असतात. फक्त त्यातील मोठेपण…रहस्य बिनचूक कसं ओळखावं हे आपले विचार आणि दृष्टीवर अवलंबून असतं..!

अशा प्रेमाच्या सर्वसमावेशक पारिवारिक उपक्रमाला अकोला येथील आमच्या पत्रकार बांधवांनी निमंत्रणांचा स्विकार करून उपस्थिती दिली.ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळीने पण अगत्याने हजेरी लाऊन आपल्या पत्रकार बांधवांना विश्वबंधुत्वाच्या भावनांनी वाटचाल करणाऱ्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या या मानवतावादी विचारमंचावर सन्मानित केले.त्या सर्व ज्येष्ठांचे लोकस्वातंत्र्य राष्ट्रीय पदाधिकारी आणि जिल्हा कार्यकारिणीकडून मन:स्वी आभारी आहोत…सर्व पत्रकारांचे आभिनंदन आणि सर्वांना धन्यवाद…भेटत राहू..‌अडीअडचणी,समस्यांच्या निराकरणासाठी…. समाज आणि पत्रकारांना न्याय देत संविधान आणि लोकशाहीच्या संवर्धनासाठी…! जय हिन्द….जय महाराष्ट्र…जय मानवता…!

*@ संजय एम.देशमुख*
संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष- लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ,अकोला मोबा.क्र.९८८१३०४५४६,८७८८६०२६३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *