म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे प्रजासत्ताक दिन सोहळा उत्सवात साजरा .
1 min read

म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे प्रजासत्ताक दिन सोहळा उत्सवात साजरा .

Loading

म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे प्रजासत्ताक दिन सोहळा उत्सवात साजरा .

भुसावळ – नगरपरिषद संचलित मुनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे २६ जानेवारी २०२६ प्रजासत्ताक दिन सोहळा अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात पार पडला. सकाळी ठीक ७:१५ वाजता भुसावळ नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ गायत्री भंगाळे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर राष्ट्रगीत व ध्वजगीत गाऊन तिरंग्याला मानवंदना देण्यात आली। सदर प्रसंगी शालेय शिक्षण सभापती राजेंद्र आवटे, नगरसेवक उल्हास पगारे, सिकंदर खान,संजय नहाटा, नगरसेविका सौ‌. सिमा नरवाडे, कैलास चौधरी,माजी नगरसेवक रवी सपकाळे,शाळेचे मुख्याध्यापक* एस.जी. मेढे*, सेवा जेष्ठ शिक्षिका सरला सावकारे,स्थानिक नागरिक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वज फडकावण्यात आला। ध्वजारोहणाआधी संविधानाचे वाचन करण्यात आले,
नंतर विद्यार्थ्यांनी देश भक्तीपर गीते सादर केली. तंबाखूमुक्त , कॉपीमुक्त मुक्त, व साक्षरतेची ची शपथ, घेतली विद्यार्थ्यांनी संगीत कवयत सादर केले. ध्वज संचालन डॉ. प्रदीप साखरे यांनी केले, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन एन. एच.राठोड यांनी केले. शाळेतील के.डी. चौधरी यांच्याकडून विद्यार्थ्यांना बिस्कीट वाटप करण्यात आले ‌व कार्यक्रमाची सांगता मिठाई वाटप करून झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *