प्रजासत्ताक दिनी गौरवाचा क्षण — भडणेचे युवराज माळी ठरले ‘उत्कृष्ट पोलीस पाटील’
1 min read

प्रजासत्ताक दिनी गौरवाचा क्षण — भडणेचे युवराज माळी ठरले ‘उत्कृष्ट पोलीस पाटील’

Loading

 

प्रजासत्ताक दिनी गौरवाचा क्षण — भडणेचे युवराज माळी ठरले ‘उत्कृष्ट पोलीस पाटील’

शिंदखेडा प्रतिनिधी :
कर्तव्यनिष्ठा, तत्परता आणि समाजहिताची जाणीव जपत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील पोलीस पाटील युवराज मोहन माळी यांचा धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हास्तरीय सन्मान करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून धुळे येथील हिरे भवन येथे दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पोलीस पाटील मेळाव्यात त्यांचा हा गौरव सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल होते. यावेळी धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे तसेच माजी संरक्षण मंत्री सुभाष भामरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते यावेळी पोलीस पाटील मार्गदर्शिका पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

धुळे जिल्हा पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या निवडक पोलीस पाटील यांना प्रशस्तीपत्र व हेल्मेट देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये भडणे येथील युवराज माळी यांची निवड होणे हा गावासाठी अभिमानाचा क्षण ठरला. त्यांच्या कार्यातून कायदा व सुव्यवस्था राखणे, गावातील सामाजिक प्रश्नांमध्ये सक्रिय सहभाग आणि प्रशासनाशी सातत्यपूर्ण समन्वय यांचा प्रत्यय येतो.

या सन्मानामुळे भडणे गावात आनंदाचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या कार्यामुळे ग्रामीण पातळीवर पोलीस यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

▪️ चौकट :

भावना व्यक्त करताना युवराज माळी म्हणाले…

> “हा सन्मान केवळ माझा नसून संपूर्ण भडणे गावाचा आहे. ‘उत्कृष्ट पोलीस पाटील’ हा मान माझ्यावर टाकलेली सामाजिक जबाबदारी अधिक वाढवणारा आहे. गावाच्या सुरक्षिततेसाठी आणि लोकसेवेसाठी मी सदैव कर्तव्यनिष्ठ राहील. हा गौरव माझ्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे.”

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *