परीक्षेपुरतं पाठांतर हे गुणवंत होण्याचं लक्षण नाही- प्रकाश अंधारे*  *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ५३ वा विचारमंथन मेळावा संपन्न*  *अतिथी व पत्रकारांना पुरस्कार सन्मान…अॕड.नितीन धूत यांचा सत्कार…विविध बळींना श्रध्दांजली*
1 min read

परीक्षेपुरतं पाठांतर हे गुणवंत होण्याचं लक्षण नाही- प्रकाश अंधारे* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ५३ वा विचारमंथन मेळावा संपन्न* *अतिथी व पत्रकारांना पुरस्कार सन्मान…अॕड.नितीन धूत यांचा सत्कार…विविध बळींना श्रध्दांजली*

Loading

*परीक्षेपुरतं पाठांतर हे गुणवंत होण्याचं लक्षण नाही- प्रकाश अंधारे*

*लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ५३ वा विचारमंथन मेळावा संपन्न*

*अतिथी व पत्रकारांना पुरस्कार सन्मान…अॕड.नितीन धूत यांचा सत्कार…विविध बळींना श्रध्दांजली*

*अकोला*–महापुरूषांच्या जीवनावर भाषणं करणारांना नंतर त्यातली माहिती विचारली तर सांगता येत नाही.शाळांमधील २० ते ३० टक्के विद्यार्थ्यांना लिहता वाचता येत नाही. दर १० वर्षांनी अभ्यासक्रम आणि अध्ययन तंत्र बदलल्यानंतर अगोदरची फलनिष्पत्ती काय ते सुध्द बघितलं जात नाही.अशा शिक्षणात नुसती परीक्षेपुरती प्रश्नांची उत्तरे पाठ करून यश मिळवणे ही गुणवंत होण्याची लक्षणे नाहीत‌.या विद्यार्थ्यांना गुणवंत नव्हे तर मार्कवंत म्हणावे लागेल. ही अधोगती विषद करणारे वास्तवतावादी प्रतिपादन निवृत्त उपशिक्षणाधिकारी व शिवाजी शिक्षण संस्थेचे सनियंत्रण अधिकारी,शैक्षणिक सेवाव्रती,प्रकाश अंधारे यांनी केले.
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या अ.भा.समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचा ५३ वा विचारमंथन मेळावा स्थानिक जठारपेठेतील जैन रेस्ट्रो येथे नुकताच संपन्न झाला त्यावेळी अध्यक्षपदावरून ते बोलत होते.लोकस्वातंत्र्यचे व्यापक संघटन,उपक्रम व पत्रकार आणि समाज कल्याणाच्या सातत्यपूर्ण प्रवासाचा त्यांनी यावेळी गौरव केला. याप्रसंगी साहित्यिक व शैक्षणिक सेवाव्रती प्रा‌.डॉ.सुहास उगले हे प्रमुख अतिथी म्हणून तर लोकस्वातंत्र्यचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख,कादंबरीकार पुष्पराज गावंडे, डॉ.निलेश पाटील,पत्रकार हाजी सज्जाद हुसैन, प्रा.डॉ.किरण वाघमारे यांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी सर्वप्रथम लोकस्वातंत्र्यचे सामाजिक अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,कर्मयोगी संत गाडगे बाबा यांना वंदन अभिवादन करण्यात आले,वहिद जवान,आत्महत्याग्रस्त शेतकरी,महिला बळी,दिवंगत पत्रकार,आपत्ती व अपघात बळींना यावेळी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.प्रदिप खाडे यांनी अतिथी आणि प्रमुख उपस्थितांचा सविस्तर परिचय दिला.अतिथींचे पुरस्कारांनी सन्मान करण्यात आले.तथा पत्रकार दिन कार्यक्रमानंतर उर्वरीत पत्रकारांना सुध्दा लोकस्वातंत्र्य प्रभावी पत्रकारिता सेवा गोरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.स्व किसनराव हुंडीवाले बहूचर्चित हत्या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून सत्त्याची बाजूने महत्वपूर्ण भुमिका घेतल्याबद्दल ॲड.नितीन धूत यांचा यावूळी सत्कार करण्यात आला.संजय देशमुख यांनी दिनदर्शिका जाहिराती,झालेला खर्च आणि पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला पदाधिकारी आणि सभासदांच्या सहयोगातून झालेल्या रू.३० हजारांच्या खर्चाचा आढावा सादर केला. यावेळी प्रा.सुहास उगले,पुष्पराज गावंडे,डॉ.निलेश पाटील,हाजी सज्जाद हुसैन, प्रा.डॉ.किरण वाघमारे,सी.ए.तुषार तल्हार यांनी सुध्दा संघटनेच्या सेवाभावी प्रवासाला आणि शिस्त आणि कल्पकतेला कौतुकास्पद संबोधून शुभेच्छा व्यक्त केल्या.

या कार्यक्रमाला राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रदिप,खाडे सचिव राजेंद्र देशमुख,सिध्देश्वर देशमुख,प्रा.डॉ.संतोष हुशे,अंबादास तल्हार,संदिप देशमुख,अॕड.नितीन धुत, डॉ.विनय दांदळे,रावसाहेब देशमुख(अमरावती) जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर,सागर लोडम, के.व्ही.देशमुख, सतिश देशमुख ,मनोहर मोहोड,प्रा‌.विजय काटे,सुरेश पाचकवडे,संजय कृ.देशमुख,विवेक मेतकर,सौ.दिपाली बाहेकर,प्रताप नागरे(वाशिम) रमेश समुद्रे,योगेश शिरसाट,अभि.पत्रकार विनायक पांडे,आशिष वानखडे पाटील,श्रीकृष्ण माळी, प्रा.सुरेश कुलकर्णी,राजाभाऊ देशमुख,चॉंद रिझवी,प्रा‌.मोहन काळे,नागोराव मोहोड,वसंतराव देशमुख,विजय मोडक,फुलचंद वानखडे, डॉ.अशोक शिरसाट,संघपाल शिरसाट, अमित इंगळे,गजानन वानखडे,अनंतराव महल्ले,नारायणराव अंधारे,कृष्णा चव्हाण,अॕड.संकेत देशमुख, डॉ.गौरव देशमुख, सी.ए. तुषार तल्हार,प्रशांत देशमुख, के.एम‌‌.देशमुख,देवानंद ढोरे,प्रशांत कोले,एकनाथ पाखरे,शरद तेलंग, हिंमत तायडे,निलेश खेळकर व अनेक नवीन पत्रकार सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन सौ.दिपाली बाहेकर यांनी तर आभारप्रदर्शन पुष्पराज गावंडे यांनी केले.व्यवस्थापन सतिश देशमुख,पंजाबराव वर,सागर लोडम,श्रीकृष्ण माळी यांनी पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *