पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बालविवाह मुक्त जळगाव जिल्हा चित्ररथ व स्वाक्षरी अभियान शुभारंभ*
![]()
*पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बालविवाह मुक्त जळगाव जिल्हा चित्ररथ व स्वाक्षरी अभियान शुभारंभ*
जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन
बालविवाह मुक्त जळगाव जिल्हा चित्र रथ व स्वाक्षरी मोहीम आज दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे पालक मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या उपस्थितीत बाल विवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत चित्ररथ व स्वाक्षरी या रथाला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले.
जस्ट राईट फॉर चिल्ड्रन अलायन्स पार्टनर आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर व जिल्हा परिषद जिल्हा महिला व बालविकास कार्यक्रम अधिकारी भदाणे ,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर.आर.तडवी, जळगाव जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह मुक्त भारत अभियान व चित्ररथ जळगाव जिल्ह्यात जास्तीत जास्त नागरिक,कुटुंब,धर्मगुरु,यांच्या पर्यंत बालविवाह मुक्त जळगाव जिल्हा हा संदेश देण्याच्या उद्देश्याने हा रथ जिल्हाभर फिरवण्यात येणार आहे.
बालविवाह करणे एक कायदेशीर गुन्हा असून मुलांचे बालपण वाचण्याचे संदेश देऊन,मुलांच्या शिक्षण आरोग्य यावर मुलांना जागरूक करण्याचे काम जळगाव जिल्हाभरात आधार संस्थामार्फत केले जात आहे,केंद्र व राज्य सरकार यांच्या मार्फत बालकांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून वंचित कुटुंबांना सर्व शासकीय योजनेला जोडण्याचे काम आधार संस्थे मार्फत जाणीव जागृती उपक्रम राबविले जात आहे.
जळगाव जिल्ह्यात आधार संस्थे मार्फत सदर प्रकल्पासाठी
आधार संस्थेचे अध्यक्ष डॉ.भारती पाटील , संचालक रेणू प्रसाद , प्रा विजयकुमार वाघमारे व प्रकल्प समन्वयक आनंद पगारे ,समन्वयक दीपक संदानशिव, मोहिनी धनगर, सुनील हिवाळे, दीपाली हिवाळे,जळगाव जिल्ह्यात कार्यरत आहेत.
आनंद पगारे
जिल्हा समन्वयक
जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन प्रकल्प जळगाव जिल्हा
आधार बहुउद्देशीय संस्था

