परीश्रम निवासी विशेष शाळेत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा – विशेष मुलांच्या कलागुणांनी जिंकली मने
1 min read

परीश्रम निवासी विशेष शाळेत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा – विशेष मुलांच्या कलागुणांनी जिंकली मने

Loading

परीश्रम निवासी विशेष शाळेत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा – विशेष मुलांच्या कलागुणांनी जिंकली मने

पारोळा (जि. जळगाव) प्रतिनिधी :
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित परीश्रम मतिमंद मुला-मुलींची निवासी शाळा, ता. पारोळा येथे दि. २६ जानेवारी २०२६ रोजी ७७ वा प्रजासत्ताक दिन देशभक्तीपूर्ण आणि उत्साहवर्धक वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली. अण्णासो. डॉ. श्री. योगेश महाजन सर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले, तर मा. दादासाहेब बाळासाहेब पाटील (ज्येष्ठ पत्रकार) यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण पार पडले. ध्वजवंदनाच्या वेळी उपस्थितांनी राष्ट्रगीत गायन करून देशाभिमान व्यक्त केला.
या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील, संस्थेचे अध्यक्ष अण्णासो. डॉ. योगेश महाजन सर, विष्णू वाघ (वाघ बाबा), गुणवंत पाटील, जितेंद्र शेवाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विशेष शिक्षक जगदीश सोनवणे सर यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन विशेष शिक्षक हेमंत महाजन सर यांनी मान्यवर व उपस्थितांचे आभार मानून केले.
विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीचे प्रदर्शन म्हणून सामूहिक कवायत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ही कवायत रामकृष्ण शेलकर व प्रताप पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. शाळेतील विशेष मुलांनी सादर केलेल्या देशभक्तीपर नृत्य, अभिनय सादरीकरण, तसेच स्वच्छता अभियानावरील जनजागृती कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे वातावरण भारावून गेले.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा करत असलेल्या कार्याचे यावेळी मान्यवरांनी कौतुक केले.
देशप्रेम, एकता आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम घडवत हा प्रजासत्ताक दिन सोहळा संस्मरणीय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *