गावाचा सन्मान, विद्यार्थ्यांचा आनंद — कुर्हे खुर्दचा प्रजासत्ताक दिन ठरला विशेष
1 min read

गावाचा सन्मान, विद्यार्थ्यांचा आनंद — कुर्हे खुर्दचा प्रजासत्ताक दिन ठरला विशेष

Loading

 

गावाचा सन्मान, विद्यार्थ्यांचा आनंद — कुर्हे खुर्दचा प्रजासत्ताक दिन ठरला विशेष

अमळनेर प्रतिनिधी

कुर्हे खुर्द गावात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
कुर्हे खुर्द गावात 77 वा प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला, या यावेळी गावाचे मूळ रहिवासी व सरला फाउंडेशन ठाणे, चे अध्यक्ष, समाज सेवक श्री सुभाष दादा सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी उपस्थित गावातील सेवानिवृत्त पी एस आय श्री कोमल सिंग दिगंबर पाटील अभिजीत महादू पाटील ,
विनोद दादा जैन,यांच्यासह समस्त गावकरी, व तरुण मित्रमंडळी उपस्थित होते, कार्यक्रमात, श्री सुभाष दादा सूर्यवंशी यांच्यासह श्री कोमल सिंग दिगंबर पाटील, श्री सुनील गणसिंग पाटील, श्री समाधान नारायण पाटील, मुख्याध्यापक मॅडम कुर्हे खुर्द , अंगणवाडी च्या मॅडम व सेवानिवृत्त बॉर्डर मॅन, श्री विजय सूर्यवंशी या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले, आदरणीय सुभाष दादा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की भविष्यात सुद्धा आपल्या गावाच्या व शाळेच्या विकासासाठी मी प्रयत्नशील राहील, भविष्यात तरुणांसाठी आणि लहान मुलांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतील असेही ते म्हणाले.आणि सर्वात मोठा आनंद म्हणजे आपल्या मराठी शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर दिसून आला, तो असा की आपल्या च शाळेत शिक्षण घेतलेला विद्यार्थी चि. पंकज हा सैन्यात भरती झाला, त्याचा आनंद म्हणून श्री विनोद गुलाब पाटील आणि भरत गुलाब पाटील यांनी सर्व लहान मुलांना व उपस्थित ग्रामस्थांना पेढा देऊन तोंड गोड केले, तसेच महत्त्वाचे म्हणजे, सुभाष दादा सूर्यवंशी यांनी, पंधरा-वीस हजार रुपये खर्च करत, शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय शिक्षण उपयोगी साहित्य म्हणजे तीन वह्या, पेन ,पेन्सिल , शॉपनर,इरेजर असं पूर्ण एक बॉक्स आणि प्रत्येकी एक कॅडबरी चॉकलेट व अंगणवाडीतील लहान मुलांना वॉटर बॉटल वाटप करण्यात आले त्यामुळे त्या लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद व उत्साह हा दीसून येत होता, उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या वतीने दादांचे या उपक्रमाबद्दल कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *