अमळनेर प्रताप कॉलेजमध्ये ज्ञानाचा उत्सव; प्रजासत्ताक दिनी १३५ विद्यार्थ्यांची सामान्य ज्ञान परीक्षा
![]()
अमळनेर प्रताप कॉलेजमध्ये ज्ञानाचा उत्सव; प्रजासत्ताक दिनी १३५ विद्यार्थ्यांची सामान्य ज्ञान परीक्षा
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथिल खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज अंतर्गत करिअर कौन्सिलिंग सेंटर द्वारा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भव्य सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.ही परीक्षा २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० ते १२ दरम्यान घेण्यात आली, प्रस्तुत परीक्षेत १३५ विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आपला सहभाग नोंदविला. प्रस्तुत परीक्षेत मेरिट मध्ये येणा-या विद्यार्थ्यांना एका समारंभात बक्षीसे प्रदान केले जातील.
प्रस्तुत परीक्षेच्या आयोजनात प्र.प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव यांनी मार्गदर्शन केले.
प्रस्तुत यशस्वीतेसाठी करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे, डॉ.धिरज वैष्णव,डॉ.आर.सी.सरवदे,
डॉ.माधव भुसनर, डॉ.धनंजय चौधरी, डॉ.रवी बाळसकर, डॉ.विवेक बडगुजर,डॉ.अमित पाटील,ग्रंथपाल दिपक पाटील,डॉ.बालाजी कांबळे,दिलीप शिरसाठ,पराग पाटील,प्रा.हिमांशू गोसावी,प्रा.अमोल अहिरे,विशाल अहिरे,डॉ.हर्ष नेतकर,डॉ.राखी घरटे,प्रा.मनिषा पारधी,सुरेश सोनवणे आदींनी सहकार्य केले.

