आध्यात्मिक ऊर्जेत देशभक्तीचा जागर — ब्रह्माकुमारीज तर्फे फरांदे पार्क, नांदेड येथे 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
![]()
आध्यात्मिक ऊर्जेत देशभक्तीचा जागर — ब्रह्माकुमारीज तर्फे फरांदे पार्क, नांदेड येथे 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
नांदेड प्रतिनिधी):
प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय, फरांदे पार्क, नांदेड येथे 77 वा प्रजासत्ताक दिन देशभक्ती, शिस्त, उत्साह आणि आध्यात्मिक वातावरणात मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. संपूर्ण परिसर राष्ट्रप्रेम, शांतता आणि सकारात्मक ऊर्जेने भारावून गेला होता.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी अनिता दिदी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाने झाली. राष्ट्रध्वज फडकताच उपस्थित सर्वांनी एकमुखाने राष्ट्रगीत सादर करून देशाप्रती आपला अभिमान आणि कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी मार्गदर्शन करताना बि.के. अनिता दिदी म्हणाल्या, “गणतंत्र दिवस यही संदेश देता है कि भले योजना, कार्य और राह अनेक हो, लेकिन मकसद, संकल्प और मंजिल एक होनी चाहिए.” त्यांच्या या विचारांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेसोबत आध्यात्मिक एकतेचाही संदेश दिला.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ बि.के. डॉ. रामरावजी जाधव भाई, प्रा. निळकंठ जाधव भाई, सुधाकर कदम भाई, बि.के. मुरलीधर भाई, डॉ. आनंदरावजी मनूरकर भाई, वाखरडकर स्वामी भाई, रुपेश पाटील भाई, बी.आर. मोरे, भारत गंदेवार, उद्योजक राजेंद्र शंकरपुरे भाई, डॉ. कल्पना जाधव, गोरे माता, स्वामी माता, बि.के. रोहीणी बहन, सुषमा बहन, सरोजिनी बहन, सोनाली बहन, शिवलीला बहन, ऋतुजा बहन तसेच फरांदे पार्क व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम भक्तिभाव, शिस्तबद्धता आणि आध्यात्मिक उर्जेच्या वातावरणात संपन्न झाला. देशभक्ती आणि आत्मिक मूल्यांचा संगम साधणारा हा सोहळा उपस्थितांच्या मनात प्रेरणेची ज्योत पेटवून गेला.

