प्रताप महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे अतिथी व्याख्यानाचे आयोजन*
![]()
*प्रताप महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे अतिथी व्याख्यानाचे आयोजन*
—————————————–
दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे सिरम इन्स्टिटयूट पुणे येथील श्री. कैलास फुलदेवरे (मॅनेजर ,डाऊन स्ट्रीम प्रोसेसिंग ) यांचे विद्यार्थ्यांना करियर विषयी मार्गदर्शन मिळावे याहेतूने ” Opportunities in Pharmaceuticals Industries” याविषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .हर्षवर्धन जाधव यांनी अतिथींचा सत्कार केला .प्रा नूतन बडगुजर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.तर विभागप्रमुख प्रा. शशिकांत जोशी यांनी विभागाविषयीची माहीत देत प्रास्ताविक सादर केले. प्रा.हेमलता सूर्यवंशी -भोसले यांनी अतिथींचा परिचय करून दिला. आपल्या ओघवत्या भाषणशैलीत फार्मा कंपन्यांमध्ये सूक्ष्मजीवशास्त्र विषयात विदयार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर शिक्षणानंतर नोकरीच्या संधी कशा उपलब्ध होतात, मुलाखतीस जातांना कशा प्रकारे तयारी असावी व कोणते प्रश्न तिथे विचारले जातात ,व त्याची उत्तरे काय देणे अपेक्षित आहे याचे मार्गदर्शन केले.प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव यांनीही मार्गदर्शनपर भाषणात कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. ममता महाजन यांनी आभारप्रदर्शन केले.याप्रसंगी अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्षाचे समन्वयक डॉ. मुकेश भोळे सर,हिंदी विभागप्रमुख डॉ.धनंजय चौधरी,डॉ.बागुल सर तसेच सूक्ष्मजीवशास्त्र विषयाचे पदवी व पदव्युत्तर वर्गांचे विद्यार्थी उपस्थित होते.सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विभागप्रमुख प्रा.शशिकांत जोशी,प्रा.वैशाली महाजन , प्रा.हेमलता भोसले,प्रा.नूतन बडगुजर,प्रा.नेहा महाजन ,प्रा . आदित्य संकलेचा,प्रा.केतकी सोनवणे,प्रा.नेहा पाटील,प्रा.ममता महाजन प्रा.कल्याणी पाटील ,प्रा.भावना महाजन,प्रा.औक्षणी साळुंखे,प्रा.दिव्या महाजन यांनी कार्यक्रमाच्या यशस्विते साठी मेहनत घेतली.

