महिलांचा सर्व समावेशक विकास महत्वाचे*- प्रा.इशिता घोष यांचे प्रतिपादन
1 min read

महिलांचा सर्व समावेशक विकास महत्वाचे*- प्रा.इशिता घोष यांचे प्रतिपादन

Loading

*महिलांचा सर्व समावेशक विकास महत्वाचे*-
प्रा.इशिता घोष यांचे प्रतिपादन
—————————————–
अमळनेर- येथील रुक्मिणी ताई वाणिज्य आणि कला महाविद्यालय,अमळनेर या ठिकाणी ‘महिला सबलीकरण’ या विषयावर चर्चासत्र नुकतेच संपन्न झाले.याप्रसंगी महिला सबलीकरण संदर्भात प्रा.इशिता घोष (पदार्थशास्त्र विभाग, प्रताप महाविद्यालय, अमळनेर) यांनी आपल्या व्याख्यानात म्हटले की, आज विविध क्षेत्रात महिला प्रगतीपथावर आहेत; परंतु स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा ‘महिला सबलीकरण’ म्हणावे तितके यशस्वी झाले असे म्हणता येत नाही,आज विविध क्षेत्रात महिला सबलीकरणाची गरज या कारणामुळे निर्माण झाली आहे. भारतात महिलांना सेवाक्षेत्र, असंघटित कामाचे ठिकाण अशा क्षेत्रात दिले जाणारे मानधन, वेतन व मोबदला हे आजच्या परिप्रेक्ष्यात अल्प स्वरूपाच्या आहे, त्यामुळे एका प्रकारची असमानता निदर्शनास येते.
विविध क्षेत्रात महिला ह्या आधारस्तंभ असल्या तरी त्यांच्या परिश्रमाच्या कथा आपण अभ्यासत असतो, त्यांना आजही अनेक ठिकाणी संघर्ष करावा लागतो. अनेक घटनेला सामोरे जावे लागते म्हणून शासनाने महिलांचा सर्वसमावेशक विकास कसा होईल ? याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शासनाने त्यांच्या साक्षरतेचा दर हा वृद्धिगत केला पाहिजे आणि राज्य व केंद्र स्तरावर शिष्यवृत्ती वाढ संबंधी सकारात्मक चर्चा केली पाहिजे. मानव म्हणून महिलांचा सन्मान, त्यांची प्रतिष्ठा कायम राखण्याची नैतिक जबाबदारी सर्वसामान्य नागरिकांची आहे म्हणून त्यांच्या सर्व समावेशक सहभाग व समतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहणे विकासाच्या संदर्भात महत्त्वाचे आहे.अशा स्वरूपाची भूमिका प्रा. इशिता घोष यांनी मांडली.
प्रस्तुत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य शेख हे होते. याप्रसंगी विद्यार्थिनींची संख्या ही लक्षणीय स्वरूपाची होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *