शिक्षिका आरती मयूर बागुल यांना ‘सावित्रीबाई फुले शिक्षिका – २०२५’ पुरस्काराने सन्मानित
1 min read

शिक्षिका आरती मयूर बागुल यांना ‘सावित्रीबाई फुले शिक्षिका – २०२५’ पुरस्काराने सन्मानित

Loading

शिक्षिका आरती मयूर बागुल यांना ‘सावित्रीबाई फुले शिक्षिका – २०२५’ पुरस्काराने सन्मानित

पुणे : महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस समिती, पश्चिम महाराष्ट्र (पुणे विभाग) शिक्षक काँग्रेस समिती व सातारा शिक्षक काँग्रेस समिती यांच्या वतीने दिला जाणारा ‘सावित्रीबाई फुले शिक्षिका – २०२५’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पुणे येथील शिक्षिका मा. सौ. आरती मयूर बागुल यांना सन्मानित करण्यात आला आहे.

मा. श्री. गोपाळ दादा तिवारी: प्रवक्ते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

शिक्षण क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय कार्य, वंचित कुटुंबातील मुलांना अध्यापनातील योगदान, सामाजिक क्षेत्रातील सहभाग, मातृत्व व सामाजिक बांधिलकी जपत केलेले शैक्षणिक कार्य तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
सदर पुरस्कारासाठी आवश्यक ती कागदपत्रे व माहिती समितीकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते, पुरस्कार वितरण सोहळा दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी सातारा येथे होणार आहे.
या निवडीबद्दल शिक्षक संघटना व शिक्षण क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *