खुला प्रवर्गाचा उमेदवार द्यावा या मागणी साठी मराठा महासंघ सातारा जिल्हाआणि मराठा क्राती मोर्चा खंडाळा यांच्या वतीने पत्रकार परिषद*
![]()
*खुला प्रवर्गाचा उमेदवार द्यावा या मागणी साठी मराठा महासंघ सातारा जिल्हाआणि मराठा क्राती मोर्चा खंडाळा यांच्या वतीने पत्रकार परिषद*
खंडाळा /श्री अनिल करंदकर मराठा महासंघ सोशल मीडिया अध्यक्ष सातारा जिल्हा
सध्या होऊ घातलेल्या सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या निवडणुकांमध्ये खंडाळा तालुक्यातील खेड व भादे हे दोन जिल्हा परिषद गट खुल्या प्रवर्गासाठी घोषित झालेले आहेत परंतु बरेच राजकीय पक्ष खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला उमेदवारी न देता राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उमेदवारी देत आहे असे लक्षात आलेले आहे खरे तर जातीयवादाच्या आधारे उमेदवारी द्यावी असा मराठा महासंघाचा हेतू नाही परंतु राखीव प्रवर्गासाठी एखादा मतदारसंघ निश्चित झाला असेल तर त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील व्यक्तीला उमेदवारी करता येत नाही हे जगजाहीर आहे परंतु खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या मतदारसंघात कोणीही व्यक्ती उमेदवारी करू शकते. दुसरा भाग पुन्हा हे मतदारसंघ केव्हा खुल्या प्रवर्गासाठी मिळतील हे सांगता येत नाही त्यामुळे हा खुल्या प्रवर्गातील व्यक्तींवर होणारा अन्याय आहे व तो सर्वच राजकीय पक्षांनी व उमेदवारांनीही समजून घ्यावा अशी विनंती मराठा महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे ज्या गटात खुला प्रवर्गातील उमेदवार आहे त्या त्या गटात खुला प्रवर्गातील उमेदवार द्यावा
अशी मराठा महासंघाची आग्रहाची मागणी आहे या साठी उद्या दिनांक २६/०१/२०२६ रोजी सकाळी ११ वाजता अखिल भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्हा(खंडाळा तालुका) आणि मराठा क्रांती मोर्चा खंडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे या पत्रकार परिषदे साठी मराठा महासंघ सातारा जिल्हा आणि मराठा क्रांती मोर्चा खंडाळा पदाधिकारी आणि जिल्ह्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत ठिकाण तहसीलदार कार्यलय खंडाळा या पत्रकार परिषदेत जास्ती जास्त पत्रकार बांधवांनी सहभाग घ्यावा असे अहवान मराठा महासंघाचे सातारा जिल्हा अध्यक्ष श्री दत्तात्रय पाटील यांनी केले आहे

