विद्यार्थ्यांच्या कलागुणांची रंगतदार उधळण — वार्डी येथे ‘करुणा उत्सवा’त सांस्कृतिक जल्लोष
![]()
*वर्डी येथील पाटील विद्यालयात करुणा उत्सव सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न*
दि.24/1/2026 शनिवार रोजी स्वा. सै. श्री शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालय व खाजगी प्राथमिक शाळा वर्डी आयोजित विद्यालयाचा “विविध गुणदर्शन कार्यक्रम *करुणा उत्सव*” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्री भाऊसाहेब थोरात-तहसीलदार चोपडा यांनी केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री.प्रा.डॉ.बी एन पाटील (सदस्य मराठी विश्वकोश मंडळ महाराष्ट्र राज्य) यांनी भूषवले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सौ. शोभाताई राजेंद्र पाटील-सरपंच वर्डी, मठाधिपती श्री दिवाकर जगन्नाथ नाथ ,श्री दीपक चंपालाल पाटील चेअरमन वि.का.सो.वर्डी, श्री धर्मराज रामभाऊ पाटील चेअरमन पीक संरक्षण सोसायटी, पोलीस पाटील श्री पद्माकर जगन्नाथ नाथ, उपसरपंच श्री देवेंद्र पाटील, श्री रविंद्र धनगर, श्री विनायकराव रामदास चव्हाण, (अध्यक्ष सातपुडा शिक्षण संस्था) श्री हरिश्चंद्र शामराव चव्हाण (चेअरमन स्वा.सै. श्री.शा.गो. पाटील विद्यालय)श्री गोपाल रामदास चव्हाण, श्री हिरालाल शामराव चव्हाण, मुनाफ पटेल इत्यादी मान्यवर उपस्थित होते.* उपस्थित मान्यवरांनी सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर उपस्थित मान्यवरांचा विद्यालयातर्फे मुख्याध्यापक श्री मोहन चव्हाण, श्री सुनील पवार मुख्या. खा.प्रा.शाळा, पर्यवेक्षक श्री आर बी साळुंखे यांनी सत्कार केला. यानंतर तालुकास्तरीय व शालेय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री मोहन चव्हाण यांनी केले.
आजच्या या कार्यक्रमात मतदार जागृती दिनाच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून माननीय तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी उपस्थित सर्व पालक वर्ग विद्यार्थी यांना मतदार जागृती ची शपथ दिली. व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळण्यासाठी संपन्न झालेल्या या करुणा उत्सवात इयत्ता १ ली ते १० वीच्या ४०० विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. सर्व वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांना यासाठी मार्गदर्शन केले.या सांस्कृतिक कार्यक्रमात गीत,नृत्य,नाटिका यांचे बहारदार कार्यक्रम सादर झाले. विद्यार्थ्यांनी सर्वधर्मसमभाव, व्यसनमुक्ती , आदिवासी नृत्य, देशभक्तीपर गीते, ऐतिहासिक व पौराणिक गीते, महिला सशक्तिकरण, लोकगीते, भारुडे, विनोदी नाटके यांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाला खूप मोठ्या संख्येने पालक व प्रेक्षकांनी उपस्थिती दिली. उपस्थित मान्यवर व पालकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाच्या आस्वाद घेतला व कौतुक केले. सुमारे ५००० ग्रामस्थ बंधू भगिनी कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एम.डी.पाटील व श्री व्ही.जी.चव्हाण यांनी केले . आभार प्रदर्शन श्री डी एस पाटील व फलक लेखन श्री बी वाय सानप यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.

