रणाईचे विद्यालयात राष्ट्रभक्तीचा दुहेरी उत्सव! नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती उत्साहात साजरी
![]()
रणाईचे विद्यालयात राष्ट्रभक्तीचा दुहेरी उत्सव! नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती उत्साहात साजरी
अमळनेर प्रतिनिधी :
आमच्या माध्यमिक विद्यालय, रणाईचे येथे आज दि. 23 जानेवारी 2026 रोजी देशभक्ती, प्रेरणा आणि आदर्श विचारांनी भारलेले वातावरण अनुभवायला मिळाले. थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयात विशेष कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. हे पूजन शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. डी.डी. इन्शुलकर व संस्थेचे समन्वयक मा. श्री. पियुषदादा शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात या महान व्यक्तिमत्त्वांना अभिवादन केले.
कार्यक्रमाचे प्रभावी प्रास्ताविक श्री. व्ही.एस. कापडणीस यांनी केले, तर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. ठाकरे सर यांनी केले. शिक्षकांनी आपल्या भाषणातून नेताजींचा त्याग, शौर्य, अदम्य देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाचा जीवनप्रवास विद्यार्थ्यांसमोर जिवंत उभा केला.
नेताजींची ऐतिहासिक घोषणा — “तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूँगा” — यामागील जाज्वल्य राष्ट्रभावनेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
या कार्यक्रमास श्री. पी.डी. पाटील, श्री. बी.डी. ठाकरे, श्री. व्ही.एस. कापडणीस, श्रीमती एस.आर. पाटील, श्रीमती रिना पाटील, श्री. डी.व्ही. देसले, लिपिक श्री. एल.व्ही. पाटील, शिपाई श्री. जी.टी. पाटील तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवृंद आणि विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी नेताजींच्या विचारांवर मनोगत व्यक्त करत देशसेवेची प्रेरणा घेतली. संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीच्या घोषणांनी, प्रेरणादायी विचारांनी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या दुहेरी जयंतीने विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेमाची नवी ज्योत प्रज्वलित केली.

