सुवर्ण इतिहासावर यंत्रांचा प्रहार! अहिल्यादेवी होळकरांच्या कार्याचा अवमान ,  फरशीसाठी वारसा उद्ध्वस्त? समाजमन संतप्त — जतन करा अन्यथा आंदोलनाचा इशारा,  अमळनेरला उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
1 min read

सुवर्ण इतिहासावर यंत्रांचा प्रहार! अहिल्यादेवी होळकरांच्या कार्याचा अवमान , फरशीसाठी वारसा उद्ध्वस्त? समाजमन संतप्त — जतन करा अन्यथा आंदोलनाचा इशारा, अमळनेरला उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

Loading

सुवर्ण इतिहासावर यंत्रांचा प्रहार! अहिल्यादेवी होळकरांच्या कार्याचा अवमान

फरशीसाठी वारसा उद्ध्वस्त? समाजमन संतप्त — जतन करा अन्यथा आंदोलनाचा इशारा

अमळनेरला उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त देशभरात त्यांच्या कार्याचा अभिमानाने गुणगौरव केला जात असतानाच, वाराणशी (काशी) येथे घडलेल्या बुलडोझर वृत्तीच्या कारवाईमुळे समाजमन दुखावल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. एकमेकांच्या सण-समारंभात आनंदाने सहभागी होणारा, आध्यात्मिक व सांस्कृतिक एकतेचा वारसा जपणारा भारतीय समाज आज या घटनेमुळे व्यथित झालेला दिसून येतो.
संपूर्ण भारताच्या आध्यात्मिक ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या वाराणशीसह देशभरात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेली भव्य, दिव्य आणि शाश्वत कामे आजही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात. रस्ते, विहिरी, घाट, धर्मशाळा, धरणे यांसारख्या जनकल्याणकारी कामांमुळे तत्कालीन समाजाला मोठा दिलासा मिळाला होता. अनेक नैसर्गिक संकटांचा सामना करूनही त्यांच्या कार्याची ओळख आणि अस्तित्व आजवर अबाधित राहिले आहे.
मात्र, ज्या ऐतिहासिक वास्तू व कार्यांचे जतन आणि संवर्धन करणे हे पुरातत्व विभागाचे कर्तव्य आहे, त्याच वारशाकडे दुर्लक्ष करून केवळ नावाची एक फरशी लावण्यासाठी इतिहासाच्या सुवर्ण विटा मातीमोल केल्या जात असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला आणि त्यांनी उभ्या केलेल्या कार्याला धक्का पोहोचवणाऱ्या या प्रकाराबाबत धनगर समाजासह भारतातील विविध जाती, धर्म आणि पंथातील नागरिकांनी तीव्र निषेध नोंदविला आहे.
या निषेधात सहभागी होत खालील सजग नागरिकांनी आपला आवाज बुलंद केला आहे : जिल्हा काँग्रेस सरचिटणीस व म.सा.प तालुकाध्यक्ष संदीप घोरपडे सर, मौर्य क्रांती संघाचे प्रदेश उपाध्यक्ष बन्सीलाल भागवत, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रा. बी. के. सुर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेल तालुकाध्यक्ष एस. सी. तेले, युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष शहराध्यक्ष देवा लांडगे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख (उबाठा) नितीन निळे, हमाल मापाडी संघटना तालुका अध्यक्ष रमेशदेव शिरसाट, काँग्रेसचे शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे, मौर्य क्रांती संघाचे तालुकाध्यक्ष गोपीचंद शिरसाट, खानदेश साहित्यिक संघाचे जिल्हाध्यक्ष व कवी शरद धनगर, मच्छिंद्र लांडगे, जिभाऊ कंखरे, लोटन चौधरी, ओबीसी असोसिएशन उपाध्यक्ष डी. ए. सोनवणे, स्टडी सेंटर संचालक मौलाना रियाज शेख, प्राध्यापक शाम पवार, एडवोकेट तिलोतमा पाटील, एडवोकेट चारु शिंदे, रज्जाक शेख, शरद पाटील, राजेंद्र पाटील, विष्णू पाटील, जयदीप सिसोदिया, किशोर पवार, भानुदास सैंदाणे, डॉक्टर महेश पाटील, किशोर धनगर, आर. टी. पाटील, गणेश कासार, ए. सी. सोनवणे, एच. टी. नंदवे, एस. ए. साळुंखे, ए. एस. पाटील, पी. पी. माळी, एस. व्ही. सैय्यद, अतुल धनगर, हाजी दबीर पठाण, भगवान संदानशिव, डॉक्टर रवींद्र पाटील, जयवंत पवार, सुधाकर भैसे, अशोक पाटील, प्रकाश पाटील.
इतिहासाचा वारसा जपणे ही केवळ प्रशासनाची नव्हे तर संपूर्ण समाजाची जबाबदारी असल्याचा संदेश या निषेधातून अधोरेखित झाला असून, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा सन्मान राखण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *