मारवड महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना ‘विशेष हिवाळी श्रम संस्कार’ शिबिराचा समारोप.—
![]()
मारवड महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना ‘विशेष हिवाळी श्रम संस्कार’ शिबिराचा समारोप.—
मारवड येथील कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयच्या वतीने कळमसरे येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष हिवाळी श्रमसंस्काराचा सात दिवसीय शिबिराचा समारोप करण्यात आला,
या श्रमसंस्कार शिबिराचे समारोपाचे अध्यक्ष मा. श्री. आबासो. देविदास शामराव पाटील ( उपाध्यक्ष ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड) हे उपस्थित होते, त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना बद्दल आपले विचार आणि मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी बापूसो. श्री. शांताराम शामराव पाटील (माजी जि. प. सदस्य), बापूसो. महारु रामदास शिसोदे, आबासो. चंद्रकांत रामराव शिसोदे, दादासो. मनोज हिम्मतराव साळुंखे, श्री. नानासो.के.व्ही.पाटिल श्री. किशोर शिसोदे ,श्री. केशव बडगुजर, श्री. प्रवीण महाजन ,श्री. ज्ञानेश्वर पाटील ,श्री. मेहमूद खाॅ.पठाण,श्री,हरिभाऊ मारवडकर,प्राचार्य डॉ.वसंत देसले हे मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. डॉ. व्हि.डी.पाटील यांनी केले,आणि राष्ट्रीय सेवा योजना शिबिरा विषयी माहिती दिली. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा.डॉ. संजय महाजन यांनी केले, तसेच प्रा. डॉ. सतीश पारधी यांनी अहवाल वाचन करून सात दिवशीय शिबिरा बद्दलची माहिती मनोगतातून व्यक्त केली.
या सात दिवशीय शिबिरातून विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण काळाची गरज, आपत्ती व्यवस्थापन, पाणलोट व्यवस्थापन, आरोग्यविषयक जनजागृती,
मतदान जनजागृती, ग्रामविकास जागो ग्राहक, जागो स्वच्छ भारत अभियान, वनसंवर्धन शाश्वत विकास युवकांचे योगदान, वंदे भारत @१५०, पाणलोट व्यवस्थापन, आणि पडीत जमीन विकास. इत्यादी विषयांवर विविध व्याख्यात्यांचे मनोगत व्यक्त करण्यात आले.
सदर कार्यक्रमास सर्व स्वयंसेवक विद्यार्थी आणि प्राध्यापक तसेच प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.

