बदलापूर स्कूल बस अत्याचार प्रकरणी; विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आज घटनेबाबत कारवाईचा आढावा घेणार*
![]()
*बदलापूर स्कूल बस अत्याचार प्रकरणी; विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आज घटनेबाबत कारवाईचा आढावा घेणार*
बदलापूर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :
बदलापूर येथे चार वर्षांच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसमध्ये अत्याचार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे *आज सायंकाळी ४.३० वाजता बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे येथे भेट घेऊन आढावा घेणार आहेत*तसेच त्यानंतर पोलीस आयुक्त यांची भेट घेणार आहेत.
या आढावा भेटीदरम्यान संबंधित प्रशासन व पोलीस यंत्रणेकडून घटनेची सविस्तर माहिती घेण्यात येणार असून, प्रकरणाच्या अनुषंगाने पुढील आवश्यक उपाययोजना व कारवाईबाबत निर्देश देण्यात येतील.

