अमळनेरच्या भगवा चौकात प्रभु श्रीराम महाआरती; प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त भक्तिमय वातावरण
1 min read

अमळनेरच्या भगवा चौकात प्रभु श्रीराम महाआरती; प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त भक्तिमय वातावरण

Loading

अमळनेरच्या भगवा चौकात प्रभु श्रीराम महाआरती; प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त भक्तिमय वातावरण

अमळनेर प्रतिनिधी :
अयोध्या येथे प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पावन प्रसंगी अमळनेर शहरातील भगवा चौक येथे भगवा चौक मित्र मंडळाच्या वतीने प्रभु श्रीराम प्रतिमेचे विधिवत पूजन व भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या धार्मिक कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला.
या वेळी व्हाईस आँफ मिडीयाचे मीडियाचे ज्येष्ठ सल्लागार,
TV9 भारतवर्ष चे वरिष्ठ प्रतिनिधी श्री. उमेश धनराळे यांनी प्रभु श्रीरामाची महाआरती केली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष गौरव प्राप्त झाला. महाआरतीदरम्यान उपस्थित भाविकांनी “जय श्रीराम” च्या जयघोषात सहभाग नोंदवला.
भगवा चौक व परिसर भगव्या पताका, दिवे व सुगंधी धूपांनी सजवण्यात आला होता. मोठ्या संख्येने नागरिक, महिला, युवक व ज्येष्ठ भाविक उपस्थित होते. भक्तीभाव, शिस्तबद्ध आयोजन आणि सामूहिक सहभागामुळे हा सोहळा अत्यंत भावपूर्ण व संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भगवा चौक मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. धार्मिक एकोपा, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक सलोखा जपणारा हा उपक्रम नागरिकांनी मनापासून स्वागत केला.
यावेळी धर्मेंद्र कोठारी, माळी समाजाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार महाजन, साळुंखे सर, दीपक सिसोदे सर ,अनिल मांडोळे ,कुलकर्णी आप्पा ,जगदाळे सर सह भगवा चौक परिसरातील मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *