अमळनेरमध्ये गणेश जयंतीनिमित्त गणेश याग व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
![]()
अमळनेरमध्ये गणेश जयंतीनिमित्त गणेश याग व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
अमळनेर प्रतिनिधी
येथील स्टेशन रोडवरील मुठे चाळ, मिल चाळ परिसरातील श्री पंचदेवता मारुती मंदिरात गुरुवार, दिनांक २२ जानेवारी रोजी गणेश जयंतीनिमित्त पारंपरिक श्रद्धा व भक्तिभावाने गणेश याग व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
माघ शुद्ध चतुर्थीच्या पावन दिवशी दरवर्षी श्री पंचदेवता मारुती मंदिरात श्री गणेश जयंती उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी श्री गणेशाचे दर्शन घेणे अत्यंत लाभदायक मानले जाते. त्यानुसार यंदाही भाविकांसाठी खास धार्मिक कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे.
गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी ९ वाजता गणेश याग (हवन पूजा), सायंकाळी ७ वाजता महाआरती तर ७.३० वाजता तीर्थप्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या धार्मिक सोहळ्यास मुठे चाळ, मिल चाळ परिसरातील रहिवासी तसेच छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळा, श्री पंचदेवता महादेव मंदिर, परांजपे चाळ व सेवेकरी मित्र मंडळ यांचे सहकार्य लाभत आहे.
या पवित्र कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री गणेशाचे दर्शन व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
।

