अमळनेरच्या दिनेश बागडेंना राष्ट्रीय पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक
![]()
अमळनेरच्या दिनेश बागडेंना राष्ट्रीय पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक
अमळनेर प्रतिनिधी :
उत्तराखंड येथे दिनांक १६ ते १८ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत अमळनेरचे सुपुत्र दिनेश शशी बागडे यांनी उल्लेखनीय कामगिरी करत रौप्य पदकावर (Silver Medal) आपले नाव कोरले आहे.
ही स्पर्धा १०७ किलो वजनी गटात पार पडली असून या गटात संपूर्ण देशातून एकूण २० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत चुरशीच्या आणि उच्च दर्जाच्या स्पर्धेत दिनेश बागडे यांनी १७० किलो वजन उचलण्याची अफलातून कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला आणि अमळनेर तालुक्याचा गौरव वाढवला.
दिनेश बागडे यांच्या या यशामुळे अमळनेर शहरासह तालुक्यात सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून क्रीडा प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, दिनेश यांनी यापूर्वीही विविध राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन अनेक पारितोषिके व पदके पटकावली असून ते सातत्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर यशाची शिखरे सर करत आहेत.
त्यांच्या या यशामागे असलेली अथक मेहनत, जिद्द, चिकाटी आणि क्रीडाप्रेम हे अनेक तरुण खेळाडूंना प्रेरणादायी ठरत आहे. दिनेश बागडे यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून भविष्यातही ते देशाचे नाव उज्वल करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

