एकीचे बळ, सण–उत्सवांचा सोहळा : भालेरावनगर–पाटीलगढीत मकरसंक्रांत व डॉ. महेश पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
![]()
एकीचे बळ, सण–उत्सवांचा सोहळा : भालेरावनगर–पाटीलगढीत मकरसंक्रांत व डॉ. महेश पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
अमळनेर प्रतिनिधी :
भालेरावनगर व पाटीलगढी (ता. अमळनेर) येथील रहिवासी नेहमीच एकोप्याने व गुण्यागोविंदाने सर्व सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी, व्याख्यान, भजनसंध्या, गुणगौरव सोहळे, गणपती उत्सव, गीतांचे कार्यक्रम, भागवत कथा तसेच धार्मिक व शैक्षणिक उपक्रम एकत्रितपणे साजरे करतात. सुख असो वा दुःख — सर्वजण एका कुटुंबाप्रमाणे एकत्र येत असल्याचे चित्र या परिसरात नेहमीच पाहायला मिळते.
आज मकरसंक्रांतीनिमित्त द्विधासर्करा योगाच्या शुभमुहूर्तावर “तीळ–गूळ घ्या, गोड गोड बोला” हा पारंपरिक कार्यक्रम सर्वांनी एकत्र येऊन साजरा केला. त्यानंतर भालेरावनगर व पाटीलगढीचे मान्यवर व सर्वांचे लाडके व्यक्तिमत्त्व डॉ. महेश पाटील (भूरा पाटील) जवखेडेकर यांच्या वाढदिवसाचा उत्साहपूर्ण सोहळा पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विजय पाटील यांनी केले.
गीतगायनाच्या कार्यक्रमात इंजिनिअर उज्वल पाटील, श्री महेंद्र काटे, श्री हरिचंद्र शिवराम कटरे व श्री रामचंद्र उपासनी यांनी सुमधुर गीतांनी वातावरण आनंदी केले.
डॉ. महेश पाटील यांच्या सामाजिक, वैद्यकीय व सेवाभावी कार्याचा सविस्तर गुणगौरव श्री विजय पाटील व श्री गोकुळ पाटील यांनी केला.
यावेळी श्री गोकुळ पाटील (मा. केंद्रप्रमुख) बोलताना म्हणाले,
“भालेरावनगर व पाटीलगढीतील सर्व बंधू–भगिनींना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. डॉ. महेश पाटील हे शांत, संयमी, समंजस, अभ्यासू, हुशार, मितभाषी, हसतमुख व मानवतेचे सेवक आहेत. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या भावनेतून ते कोणतेही वेळेचे बंधन न पाळता, रात्री–अपरात्रीही लोकांच्या आरोग्यासाठी धावून जातात. कार्यक्षेत्रालाच तीर्थक्षेत्र मानणारे, मातृहृदयी, साधुसंतांप्रमाणे निष्ठेने सेवा करणारे, आदर्श व सेवाभावी डॉक्टर म्हणून त्यांची ओळख आहे.”
डॉ. महेश भूरा पाटील जवखेडेकर
(रा. पाटीलगढी, ता. अमळनेर, जि. जळगाव)
यांना यावेळी उपस्थित सर्व बंधू–भगिनींकडून जन्मदिनाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
परमेश्वर त्यांना उदंड, आरोग्यमय आयुष्य देवो व सदैव सुखी–आनंदी ठेवो, अशी प्रार्थना उपस्थितांनी केली. तसेच सूर्य आश्लेषा नक्षत्रातील राशीत प्रवेश करत असताना, “तीळ–तीळ वाढावी तशीच त्यांच्या आयुष्यात यश, कीर्ती, ज्ञान, सुख, समृद्धी व धनसंपत्ती वाढत जावो,” अशी मंगलकामना सर्वांसाठी व्यक्त करण्यात आली.
यावेळी यांची होती उपस्थिती
बापूसाहेब महेश देशमुख नगरसेवक,सामाजिक कार्यकर्ते रवी दादा पाटील ,रामचंद्र उपासनी मा नायब तहसीलदार, विलास पाटील मुख्याध्यापक, व्ही ए पाटील मुख्याध्यापक, अनिल दुसाने आयटीआय, दिनेश पाटील वकील, ए,डी पाटील मा. प्राचार्य एम.ए.पाटील प्राचार्य, श्रीराम नाना पाटील, सदाशिव पवार, वाघ सर, पी वो पाटील, रामकृष्ण पाटील राज्य कार्याध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी संघ, संदीप बापू पाटील मा. जि प सदस्य, डॉ गणेश पाटील, डॉ. लांबोळे मेडिकल ऑफिसर, डॉ. संजय रनाडकर जानवे पी एस सी, दिनेश पाटील कृषी अधिकारी,दादाभाऊ पाटील, डॉ. संजय मुसळे,किशोर पाटील इंजिनिअर, उज्वल पाटील इंजिनिअर, भूषण भांडारकर, अमोल कोठावळे, कुलकर्णी दादा, गंगाधर अहिरराव, चेतन साळुंखे,पराग पाटील तलाठी आप्पा, परब वाघ सर,इ. बहुसंख्य भालेरावनगर, पाटीलगढी व डॉक्टरसाहेब यांच्यावर प्रेम करणारे उपस्थित होते.




