माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा क्र. ३ ची पडताळणी पूर्ण रणाईचे माध्यमिक विद्यालयास केंद्रप्रमुखांची भेट; सुविधांबाबत समाधान
1 min read

माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा क्र. ३ ची पडताळणी पूर्ण रणाईचे माध्यमिक विद्यालयास केंद्रप्रमुखांची भेट; सुविधांबाबत समाधान

Loading

‘माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा क्र. ३ ची पडताळणी पूर्ण
रणाईचे माध्यमिक विद्यालयास केंद्रप्रमुखांची भेट; सुविधांबाबत समाधान

अमळनेर प्रतिनिधी :
आज रणाईचे ता. अमळनेर येथील माध्यमिक विद्यालयात ‘मा. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमाच्या टप्पा क्र. ३ अंतर्गत पडताळणीसाठी फाफोरे केंद्राचे केंद्रप्रमुख मा. श्री. गवते सर व मा. श्री. महाजन सर यांनी भेट दिली.

या भेटीदरम्यान केंद्रप्रमुखांनी उपक्रमातील सर्व मुद्यांवर सखोल व सविस्तर माहिती घेतली. शाळेतील भौतिक सुविधा, वर्गखोल्या, स्वच्छता व्यवस्था, परसबाग, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, शालेय अभिलेखे तसेच इतर आवश्यक बाबी प्रत्यक्षपणे पाहून त्याची पाहणी केली. शाळेतील उपक्रमशील वातावरण व नियोजनबद्ध कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले, तसेच पुढील सुधारणा व अधिक दर्जात्मक विकासासाठी मोलाच्या सूचना दिल्या.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. ज्ञानेश्वर दगडू इन्शुलकर यांनी केंद्रप्रमुखांचे स्वागत करून शाळेतील विविध उपक्रम, शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थीकेंद्रित कामकाजाची माहिती दिली.

या प्रसंगी शाळेतील शिक्षक श्री. पी. डी. पाटील, श्री. व्ही. एस. कापडनीस, श्री. डी. व्ही. देसले, उपशिक्षिका श्रीमती सरोजिनी पाटील, श्रीमती रिना पाटील, लिपिक श्री. एल. व्ही. पाटील, शिपाई श्री. जी. टी. पाटील, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू–भगिनी उपस्थित होते.

या पडताळणीमुळे शाळेतील गुणवत्तावाढीस चालना मिळून ‘माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे स्पष्ट झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *