रणाईचे माध्यमिक विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
![]()
रणाईचे माध्यमिक विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
अमळनेर प्रतिनिधी :
आज दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी रणाईचे येथील माध्यमिक विद्यालयात ‘राष्ट्रमाता जिजाऊ जयंती’ व ‘स्वामी विवेकानंद जयंती’ मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. डी. डी. इन्शुलकर सर यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करून करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या दोन महान विभूतींच्या जीवनकार्यावर आधारित आपले मनोगत सादर केले. राष्ट्रमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेले संस्कार, त्याग व मातृत्वाची महती, तसेच स्वामी विवेकानंदांनी दिलेला आत्मविश्वास, राष्ट्रभक्ती व युवाशक्तीचा संदेश विद्यार्थ्यांच्या शब्दांतून प्रभावीपणे मांडण्यात आला.
यावेळी काही विद्यार्थिनींनी सादर केलेल्या सुरेख नृत्यप्रस्तुतींनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांनी या सादरीकरणाचे उत्स्फूर्त टाळ्यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाची सांगता अध्यक्षीय भाषणाने करण्यात आली. भाषणात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा अंगीकार करून विद्यार्थ्यांनी चरित्र्यसंपन्न, देशभक्त व कर्तव्यनिष्ठ नागरिक घडावे, असे मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमप्रसंगी शाळेचे शिक्षक श्री. पी. डी. पाटील, श्री. बी. डी. ठाकरे, श्रीमती एस. आर. पाटील, श्रीमती आर. ए. पाटील, श्री. डी. व्ही. देसले, शाळेचे लिपिक श्री. एल. व्ही. पाटील, शिपाई श्री. जी. टी. पाटील, तसेच सर्व शिक्षक–शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी–विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रेरणादायी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, आत्मविश्वास व आदर्श मूल्यांची रुजवण झाली, असे सर्व उपस्थितांनी मत व्यक्त केले.

