देवगाव–देवळीचा सुपुत्र देशसेवेच्या वाटेवर : वीरेंद्र पाटील यांची ITBP मध्ये निवड
![]()
देवगाव–देवळीचा सुपुत्र देशसेवेच्या वाटेवर : वीरेंद्र पाटील यांची ITBP मध्ये निवड
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
देवगाव–देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचा आणखी एक माजी विद्यार्थी देशसेवेच्या पवित्र कार्यासाठी सज्ज झाला असून, विरेंद्र प्रविण पाटील यांची SSC GD मार्फत भारत–तिबेट सीमा पोलीस दल (ITBP) या प्रतिष्ठित पदासाठी निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे देवगाव–देवळी गावासह संपूर्ण तालुक्यात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विद्यार्थीदशेतच जिद्द, आत्मविश्वास आणि चिकाटीचे दर्शन घडवणारा विरेंद्र हा महात्मा फुले हायस्कूलमधील अत्यंत हुशार व शिस्तप्रिय विद्यार्थी म्हणून परिचित होता. शिक्षणासोबतच तो आपल्या आई-वडिलांना घरकाम व शेतीकामात, वडिलांच्या व्यवसायात
नेहमीच मदत करत असे. कष्ट, प्रामाणिकपणा आणि सातत्य या गुणांच्या बळावरच त्याने आज हे यश संपादन केले आहे.
देवगाव–देवळी गावासाठी ही आणखी एक अभिमानास्पद बाब ठरली आहे. माजी सरपंच श्री. पुंडलिक छबिलाल पाटील यांचे पुतणे व कष्टाळू व्यक्तिमत्व असलेले श्री. प्रविण छबिलाल पाटील यांचे सुपुत्र चि. विरेंद्र (वैभव) पाटील यांच्या निवडीमुळे गावातून आणखी एक तरुण देशसेवेसाठी पुढे आला आहे. या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे हार्दिक अभिनंदन होत आहे.
आदर्श देवगाव–देवळी गावातील संघर्ष अभ्यासिका वर्गातून अनेक विद्यार्थी मार्गदर्शन घेत असून, आज विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत. सध्या गावातील विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षांकडे वाढलेला कल, सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर मेहनत व आत्मविश्वास यामुळे हमखास यश मिळते हे देवगाव–देवळीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.
वीरेंद्रच्या या यशाबद्दल महात्मा फुले हायस्कूलचे अध्यक्ष श्री. विलासराव शांताराम पाटील, शाळेचे मुख्याध्यापक श्री. अनिल महाजन तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष अभिनंदन केले आहे. देवगाव–देवळीतील ग्रामस्थ मंडळ, माजी विद्यार्थी संघटना व मित्रपरिवाराकडूनही विरेंद्रच्या यशावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, “असेच अनेक युवक देशसेवेसाठी पुढे यावेत” अशी सदिच्छा सर्वांकडून व्यक्त केली जात आहे.

