खडके येथे जिजामाई प्राथमिक विद्यामंदिरात बालमेळाव्याचा उत्साह; सौ. जयश्रीताई भोळे यांचा वाढदिवस आनंदात साजरा
![]()
खडके येथे जिजामाई प्राथमिक विद्यामंदिरात बालमेळाव्याचा उत्साह; सौ. जयश्रीताई भोळे यांचा वाढदिवस आनंदात साजरा
बातमी :
खडके : जिजामाई प्राथमिक विद्यामंदिर, खडके येथे मंगळवार, दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी बालमेळाव्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवाजी विद्या प्रसारक मंडळाच्या सदस्या सौ. जयश्रीताई दिलीप भोळे यांचा वाढदिवसही विद्यार्थ्यांच्या सहभागातून आनंदात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास शिवाजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी आमदार मा. श्री. दिलीपभाऊ आत्माराम भोळे, सौ. जयश्रीताई भोळे यांच्यासह संचालक मंडळातील नंदकिशोर चौधरी, अशोक सरोदे, उदयसिंग पाटील, विष्णू मोरे, गोपाळ भारंबे आदी मान्यवर उपस्थित होते.
बालमेळाव्यात बालवाडीपासून इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने घरून विविध खाद्यपदार्थ तयार करून शाळेत विक्रीस ठेवले होते. ढोकळे, गोळ्या-बिस्किटे, कचोरी, समोसे, इडली, सोयाबीन वडी, मंचुरियन, पाणीपुरी, भेळ, फळांचे ज्यूस, कोथिंबीर वडी, पावभाजी, दाबेली आदी विविध पदार्थांच्या स्टॉल्समुळे मेळाव्यात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.
या बालमेळाव्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून पैशांची देवाण-घेवाण, खरेदी-विक्रीची प्रक्रिया, पैशांचा योग्य वापर, व्यवहारज्ञान आणि आत्मविश्वास वाढवणे हा होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार कौशल्ये विकसित होण्यास मोठी मदत झाली.
कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेच्या अध्यक्षा सौ. जयश्रीताई भोळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त त्यांनी जिजामाई प्राथमिक विद्यामंदिर, खडके या शाळेस ११० गोष्टींची पुस्तके भेट दिली. तसेच विद्यार्थ्यांना केक व चॉकलेटचे वाटप करण्यात आले.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय साखरे सर, उपशिक्षक ज्ञानदेव पाटील, निलेश महाजन, सौ. निलीमा फेगडे, वैशाली पाटील, माधुरी वाघ, ममता तळेले, आरती बडे, चारू झोपे व रोमाली वाघुळदे यांनी अथक परिश्रम घेतले. बालमेळावा व वाढदिवसाचा हा संयुक्त कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व शिक्षणमूल्य देणारा ठरला.

