मानवी नात्यात गोडवा निर्माण करणारा कृषी संस्कृतीचा अप्रतिम सण मकर संक्रांत !!!
1 min read

मानवी नात्यात गोडवा निर्माण करणारा कृषी संस्कृतीचा अप्रतिम सण मकर संक्रांत !!!

Loading

मानवी नात्यात गोडवा निर्माण करणारा कृषी संस्कृतीचा अप्रतिम सण मकर संक्रांत !!!

भारतामध्ये सण उत्सवाचे परंपरा कृषी संस्कृतीतून आली. आमची मूळ संस्कृती ही शेतीवर आधारित होती. सर्व सण व उत्सव सनातन संस्कृतीची ओळख करून देतात. मकर संक्रांत हा सण शेतीतून आलेला हंगाम शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंदाचा बहर घेऊन येतो. शेतातून आलेले अन्नधान्य शेतकऱ्याला आनंदी करत असते. या आनंदातून तो घरामध्ये गोडधोड बनवीत असतो. एकमेकांना भेटून आनंद व्यक्त करीत असतो. एकमेकांना दान देण्याचा संकल्पही कधीच असतो. आपल्याला मिळालेल्या धान्यातून भुकेल्याला अन्न मिळावे ही अपेक्षा शेतकऱ्याची असते. शेतकरी मूळ कुणबी होय. शेतीशी संबंधित सर्व लोक आनंदाने एकमेकांना भेटतात. एकमेकांमधील वाद सोडून गोड पदार्थ देऊन सुसंवाद साधत होते गावात कुणी भुकेले झोपणार नाही याची काळजी घेतली जात असे. असा सण कृषी संस्कृतीचे लोक साजरा करीत होते. शेतीमधून आलेल्या गोड धान्याचे वाटप करून एकमेकांना भेटून स्नेह वाढवीत होते. शेतामधून गहू, ज्वारी ,बाजरी, हरभरा,तीळ,तांदूळ या धान्याचे पदार्थ बनवून वाटप करीत होते. शेतकऱ्यांमध्ये निसर्गाने दिलेल्या धान्याबद्दल कृतज्ञता दिसून येत होती. कालांतराने खगोल शास्त्रातील शोधामुळे सूर्य, चंद्र, ग्रह यांच्या गतीनुसार बारा राशी तयार करण्यात आल्या. सुरुवातीला अरबांनी खगोलशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात केली. ग्रीकांनी राशीचा शोध लावला. भारताच्या ज्योतिष लिहिणाऱ्यांनी त्यांच्या पंचांगात राहू व केतू अस्तित्वात नसलेले ग्रह मानले. तशी पाहता सूर्य हा ग्रह नसून तारा आहे. चंद्र हा ग्रह नसून पृथ्वीचा उपग्रह आहे. प्लुटो व नेपच्यून या ग्रहांचा शोध नंतर लागलेला आहे. भारतीय ज्योतिषांनी पंचांगात राहू व केतू या काल्पनिक ग्रहांची कल्पना मांडली. ग्रहांचा मानवी जीवनावर काहीही परिणाम होत नाही. पुरोहितांनी सणांच्या माध्यमातून त्यांना कायमची मिळकत मिळत राहावी म्हणून विविध व्रते सणांमध्ये लावून ठेवली. हे सण नाही साजरे केले तर तुमच्या हातून पाप घडते असे सांगून भीती निर्माण करून ठेवली. खरे पाहता 22 डिसेंबर या दिवशी राशींची निर्मिती झालेली आहे. इतर देशांच्या संशोधनानुसार 22 डिसेंबर हा दिवस सूर्याच्या किरणांचा पृथ्वीवर सरळ रेषेत पडण्याचा प्रारंभ दिवस होय. विदेशात या दिवसाला भूगोल दिवस म्हणून साजरा करतात. भारतात मात्र काही लोक मकर संक्रांतीच्या दिवशी भूगोल दिवस साजरा करीत असतात. एस्ट्रोलॉजी हा ज्योतिष या विषयाचा अभ्यास करण्याची शाखा आहे. ही शाखा शास्त्रज्ञांनी अवैज्ञानिक माणलेली आहे. खगोलशास्त्र हे वैज्ञानिक आहे. भारतीय पंचांग एकूण 22 होते. त्यापैकी आता पाच पंचांग अभ्यासले जातात. जगात चंद्राच्या गतीवरून व सूर्याच्या भासमान तुझ्या भ्रमणातून दिनदर्शिका बनविण्यात आलेलया आहेत. भारतात तिथीनुसार दिनदर्शिका तयार करण्यात आलेली आहे. त्यानुसार चैत्र महिन्यापासून आपले नववर्ष सुरू होते. ग्रेगरियन नुसार जानेवारी पासून नववर्षाला सुरुवात होते. अवकाशात विशिष्ट वेळेला होणाऱ्या विविध आकारानुसार राशी निर्माण झाल्या. त्यातील दहावी रास मकर रास होय. प्राचीन काळातील ऋषींच्या पुस्तकांमध्ये ग्रह व राशी यांचा उल्लेख आलेला आहे. त्यात लागध ऋषीच्या वेदांग ज्योतिष या ग्रंथात ग्रह व राशी याबाबत माहिती आहे. पराशर, भृगू, गर्ग, वशिष्ठ, कश्यप, नारद यांच्या ग्रंथांमध्ये ज्योतिष बाबत उल्लेख आढळतो. ग्रहांना नावे नंतर देण्यात आली. आर्यभट्ट, वराह मिहीर, भास्कराचार्य या लोकांनी खगोलशास्त्रामध्ये संशोधन करून भर टाकली. विविध पद्धतीचे आकार विशिष्ट वेळेला दिसून येत असल्याने त्यानुसार राशी ची मांडणी त्यांनी केली. मकर म्हणजे मगराचे तोंड व माशाचा आकार अशी रचना तयार होते त्यावेळी मकर राशी असते असे मानण्यात आले. सूर्य हा मकर राशीत जातो असे सांगण्यात येते. परंतु सूर्य हा कोणत्याही मकर राशीत जात नाही. पृथ्वी चा भाग सूर्याच्या समोर येतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही. अवकाशातील राशींना त्यांच्या आकारानुसार नावे देण्यात आलेली आहे. मकर म्हणजे मगर होय. पंचांगामध्ये राहू व केतू असे दोन ग्रह काल्पनिक मानलेले आहे. खरे पाहता पृथ्वीच्या अंतरंगात गुरुत्वाकर्षण शक्ती असल्याने भरती ओहोटी होते. वातावरणात बदल होतात परंतु पृथ्वीचा मानवी जीवनावर परिणाम दाखवलेला नाही. ज्योतिषांनी आपले पोटपूजा कायम चालावी या उद्देशाने या दिवशी शाही स्नान करण्याची कल्पना मांडली. दररोज आपण स्नान करीत असतो मग शाही स्नानाला काय महत्त्व? माणसाच्या करुणेमुळे , शुद्धआचरणाने, शील संपन्नपणाने जीवन समृद्ध होते. ह्या बाह्य अवडंबराने काहीही फरक पडत नाही. आपल्या पूर्वजांनी निसर्गाच्या कृतज्ञतेसाठी सण व उत्सव निर्माण केलेत. एकमेकांच्या जीवनामध्ये सुसंवाद कायम नांदावा यासाठी सणांची सुरुवात झालेली आहे. मकर संक्रांत म्हणजे सूर्याच्या किरणांचे पृथ्वीवरील पडणारी सरळ मार्गी स्थिती होय. त्या दिवसापासून निर्माण होते. त्याप्रमाणे तीळ आणि गूळ हे पौष्टिक घटकाप्रमाणे मानवी जीवनात नवचैतन्य निर्माण होते. प्रत्येक माणसाच्या घरी जाऊन त्याला आपण एक आहोत ही भावना रुजवण्यासाठी कृषी संस्कृतीमध्ये हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांत म्हणजे सूर्याची किरणे सरळ रेषेत पृथ्वीवर पडण्याची स्थिती म्हणजे संक्रमण होणे तसेच ते संक्रमण मकर राशी आल्यावर होणे म्हणजे मकर संक्रांत होय. मकर संक्रांत च्या दिवशी देवाला भोग दिला जातो म्हणून या दिवसाला भोगी असे म्हणतात. संक्रांत एखाद्या वाहनावर येते अशी काल्पनिक कथा ज्योतिष करीत असतात. यंदा वाहन वाघ आहे असे सांगितले आहे. वास्तविक पाहता सूर्याच्या किरणाचा व वाहनाचा काही संबंध नाही. या दिवशी गरजूंना दान दिले पाहिजे असे सांगण्यात येते. त्या काळात कृषी संस्कृतीमध्ये लोक आपल्या बांधवांना मदत करीत असत. जे लोक गरजू आहेत त्यांना मदत करणे हे चांगले कार्य आहे. दुसऱ्याला देण्याची वृत्ती चांगली आहे. या दिवसाला एकमेकातील वैर विसरून त्याच्याशी प्रेमाने ,आनंदाने, स्नेहाने वागण्याचा चांगला दिवस मकर संक्रांत होय. सणांमध्ये आलेल्या कर्मकांड्याला सोडून जीवन जगले तर सण आपल्याला ऊब देतात. सर्व सण व उत्सव मानवाला प्रेरणा देण्यासाठी असतात. अंधश्रद्धा वाढवणारे सण हे कृषी संस्कृतीचे सण नाहीत. निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूर्वजांनी हे सण साजरे केले. मकर संक्रांतीच्या सर्व बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा!!

पत्रकार
एस.एच.भवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *