डॉ. दत्ता विघावे यांचा ‘Extraordinary People of India’मधील टॉप १०० यादीत गौरवपूर्ण समावेश
![]()
डॉ. दत्ता विघावे यांचा ‘Extraordinary People of India’मधील टॉप १०० यादीत गौरवपूर्ण समावेश
मुंबई :
सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, क्रीडा, पर्यावरण, पत्रकारिता व महिला सबलीकरण अशा विविध क्षेत्रांत भरीव आणि सातत्यपूर्ण योगदान देणारे डॉ. दत्ता विघावे यांचा भारतातील नामवंत ‘Extraordinary People of India’ या प्रतिष्ठित पुस्तकातील टॉप १०० व्यक्तींच्या यादीत सन्मानपूर्वक समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या बहुआयामी कार्याची ही राष्ट्रीय पातळीवरील दखल मानली जात आहे.
यापूर्वीही ‘वीरों की शौर्यगाथा’ या पुस्तकात त्यांचा समावेश झाला असून, समाजहितासाठीच्या कार्यामुळे ते कायम चर्चेत राहिले आहेत.
या मानाच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, रजनीकांत, रतन टाटा, सचिन तेंडुलकर, नीरज चोप्रा, शाहरुख खान, अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, आमिर खान, सलमान खान, हरमनप्रीत कौर, सुंदर पिचाई, आनंद महिंद्रा, विराट कोहली, सुधा मूर्ती, कॅप्टन नरेंद्रकुमार सिध्दू यांसारख्या देश-विदेशात प्रेरणास्थान ठरलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. अशा दिग्गजांच्या पंक्तीत डॉ. विघावे यांचा समावेश होणे ही त्यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवरील मान्यता आहे.
डॉ. विघावे यांनी ग्रामीण भागात शैक्षणिक मार्गदर्शन, देहदान जनजागृती मोहिमा तसेच सामाजिक प्रबोधनाचे कार्य प्रभावीपणे राबवले आहे. क्रिकेट विषयावरील त्यांचे आयपीएल, वनडे, टी-२० व कसोटी सामन्यांचे सखोल विश्लेषण, आकडेवारीसह अभ्यासपूर्ण मांडणी यामुळे ते क्रिकेटप्रेमींमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. समाजातील दुर्बल घटकांसाठी केलेले कार्य व सामाजिक चळवळीतील सहभाग हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक वैशिष्ट्य ठरले आहे.
विशेष म्हणजे, रशिया, अमेरिका व ऑस्ट्रेलिया येथील सॅटेलाईट मॅगझिन्समध्येही अतिउच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक पातळीवरील नामवंत व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश झाला आहे.
पाच विश्वविक्रमांचे धनी असलेल्या डॉ. विघावे यांना यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार (२०२१–२२), दादासाहेब फाळके काफ अॅवॉर्ड (२०२५) यांसह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. क्रिकेट या विषयावर त्यांनी डॉक्टरेट व डी.लिट पदव्या मिळवून शैक्षणिक क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे.
या सन्मानाबाबत भावना व्यक्त करताना डॉ. विघावे म्हणाले,
“हा सन्मान केवळ माझा नसून माझ्या मार्गदर्शकांचा, हितचिंतकांचा आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या पाठिंब्याचे प्रतीक आहे. देशातील लोकांपर्यंत योग्य माहिती, शिक्षण व मार्गदर्शन पोहोचवणे हेच माझे ध्येय आहे.”
हा गौरव डॉ. दत्ता विघावे यांच्या सातत्यपूर्ण कार्याची, सामाजिक बांधिलकीची आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची देशपातळीवरील मान्यता दर्शवणारा ठरला आहे.
आदरणीय समिक्षक डॉक्टर दत्ता विघवे सर यांच्या या प्रेरणादायी कार्य कर्तृत्वाला मराठी लाईव्ह न्युज च्या वतीने सलाम व भावी वाटचालीला शुभेच्छा!!
💐💐💐

