प्रताप महाविद्यालयात घोषवाक्य लेखन स्पर्धा संपन्न*
1 min read

प्रताप महाविद्यालयात घोषवाक्य लेखन स्पर्धा संपन्न*

Loading

*प्रताप महाविद्यालयात घोषवाक्य लेखन स्पर्धा संपन्न*
——————————————-
अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या (स्वायत्त) मराठी विभागाच्या वतीने दिनांक १२ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १२:३० या वेळेत पूज्य. साने गुरुजी सभागृहात घोषवाक्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून, शिरपूर येथील आय.एम.आर.डी.ए. महाविद्यालयाच्या कासार आर्या मिलिंद व गिरासे हिताक्षी किशोर सिंग या अतिथी विद्यार्थिनींच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचे आयोजन मराठी विभागाच्या पुढाकारातून करण्यात आले होते.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच. डी.जाधव यांनी राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारक्षम नेतृत्वाचा उल्लेख करत विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून विचारप्रधान लेखन करावे, असे प्रतिपादन केले. तसेच एम.सी.ए. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.वर्षा पाठक यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा संदर्भ देत तरुणाईने आत्मविश्वास, राष्ट्रभक्ती व नैतिक मूल्ये जोपासण्याचे आवाहन केले.
या घोषवाक्य लेखन स्पर्धेचे परीक्षण मराठी विभागाचे प्रमुख डॉ.ज्ञानेश्वर कांबळे व इतिहास विभागाचे प्रा.विजय साळुंखे यांनी केले. परीक्षणानंतर आपल्या मनोगतात डॉ.ज्ञानेश्वर कांबळे यांनी स्पर्धेतील विद्यार्थ्यांच्या घोषवाक्यांतून सामाजिक भान व वैचारिक प्रगल्भता दिसून आल्याचे नमूद केले, तर प्रा. विजय साळुंखे यांनी इतिहास, संस्कृती व राष्ट्रनिर्मितीशी निगडित विचार घोषवाक्यांमध्ये प्रभावीपणे मांडले गेले असल्याचे सांगितले.
प्रस्तुत स्पर्धेत लिना चंद्रकांत बारी हिने प्रथम, तर सिद्धी अनिल काटकर हिने द्वितीय पारितोषिक पटकावले. सदर स्पर्धेत जवळपास २५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून ही स्पर्धा यशस्वी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *